esakal | CoronaUpdate: उस्मानाबाद जिल्ह्यात १५३ जणांना कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad Corona Update

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गुरुवारी (ता.२०) आलेल्या अहवालामध्ये १५३ रुग्णाची भर पडली आहे, तर मृतांची संख्या एक असली तरी गेल्या दोन ते तीन दिवसांतील एकत्रित मृत्युची नोंद आज करण्यात आली आहे. यामध्ये हा आकडा दहाने वाढल्याचे दिसून येत आहे.

CoronaUpdate: उस्मानाबाद जिल्ह्यात १५३ जणांना कोरोनाची लागण

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये गुरुवारी (ता.२०) आलेल्या अहवालामध्ये १५३ रुग्णाची भर पडली आहे, तर मृतांची संख्या एक असली तरी गेल्या दोन ते तीन दिवसांतील एकत्रित मृत्युची नोंद आज करण्यात आली आहे. यामध्ये हा आकडा दहाने वाढल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी दहा जणांच्या मृत्युची नोंद झाल्याने आकडा वाढुन ११६ इतका झाला आहे. कळंब शहरातील सोनार गल्ली येथील ६२ वर्षीय महिलेचा बुधवारी (ता.१९) जिल्हा रुग्णालयात मृत्यु झाला आहे.

उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील ६५ वर्षीय महिलेचा मंगळवारी (ता.१८) उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे मृत्यु झाला आहे. उमरगा तालुक्यातील कसगी येथील ९० वर्षीय पुरुषाचा बुधवारी (ता.१९) उमरगा येथील खासगी रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे. उमरगा तालुक्यातील तलमोड गावातील ६८ वर्षीय पुरुषाचा उपजिल्हा रुग्णालयामध्ये बुधवारी मृत्यु झाला आहे. उमरगा शहरातील महादेव गल्ली येथील ६० वर्षीय व्यक्तीचा उपजिल्हा रुग्णालयात मृत्यु झाला. उस्मानाबाद तालुक्यातील अंबेजवळगा येथील ५० वर्षीय स्त्रीचा गुरुवारी (ता.२०) जिल्हा रुग्णालयात मृत्यु झाला आहे.

वाचा : आई झाली भावूक, तहसीलदार मुलाने सहा महिन्यानंतर घेतली भेट

उस्मानाबाद शहरातील आनंदनगर भागामध्ये राहणाऱ्या ६५ वर्षीय पुरुषाचा (ता.१९) सोलापुर येथे मृत्यु झाला आहे. तुळजापुर तालुक्यातील मसला खुर्द येथील ९० वर्षीय पुरुषाचा रविवारी (ता.१६ ) तुळजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात मृत्यु झाला आहे. तालुक्यातील सिंदफळ येथील ६५ वर्षीय पुरुषाचा तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात मृत्यु झाला आहे. तुळजापुर तालुक्यातील इटकळ येथील ७५ वर्षीय महिलेचा तुळजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये बुधवारी (ता.१९) रोजी मृत्यु झाला आहे. अशा १० जणांच्या मृत्युची नोंद झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडुन देण्यात आली आहे.

गुरुवारी आलेल्या १७५ बाधितांपैकी ८३ जण आरटीपीसीआर ८३, तर जलद अँटिजेन चाचणीमधून ७० जण पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये तालुकानिहाय उस्मानाबाद ६०, तुळजापुर २१ , उमरगा १८ , कळंब १०, परंडा २५, लोहारा आठ, भूम एक, वाशी दहा अशा १५३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या नवीन रुग्णांमुळे रुग्णसंख्या चार हजार ६२ वर गेली आहे. त्यातील दोन हजार ३७४ इतक्या रुग्णांवर उपचार करुन घरी पाठवुन देण्यात आले आहे. सध्या एक हजार ४२३ रुग्णावर उपचार सुरु असुन आतापर्यंत १११ लोकांचे कोरोनाने मृत्यु झाले आहेत.

(संपादन : गणेश पिटेकर)

loading image
go to top