esakal | उदगीरात कोरोनाचे सतरा रुग्ण, चाचण्या वाढवण्यावर भर
sakal

बोलून बातमी शोधा

corona

उदगीर शहर व परिसरात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र नागरिक गर्दी करत रस्त्यावर येत असल्याने प्रशासनाची दमछाक होत आहे.

उदगीरात कोरोनाचे सतरा रुग्ण, चाचण्या वाढवण्यावर भर

sakal_logo
By
.युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : शहर व परिसरात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र नागरिक गर्दी करत रस्त्यावर येत असल्याने प्रशासनाची दमछाक होत आहे.सोमवारी (ता.२४) रात्री उशिरा आलेल्या अहवालात सतरा कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे.


रविवारी (ता.२३) लातूरच्या प्रयोगशाळेत पाठवलेल्या ४२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल सोमवारी उशिरा प्राप्त झाला आहे. त्यात नवीन १७ जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे.यात सन्मित्र कॉलनी ७, श्रीनगर कॉलनी ३, नाईक चौक १, आदर्श सोसायटी २, आनंद नगर १, हावागीस्वामी कॉलनी १, दत्तनगर १, डोंगरशेळकी १ येथील या रूग्णांचा समावेश असल्याची माहिती माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ हरिदास व कोविड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ.देशपांडे यांनी दिली आहे.

तलाठी, मदतनीसास लाच घेताना पकडले, आठ हजारांची केली होती मागणी


या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तपासण्या वाढवण्यावर भर दिला आहे. तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर जलद अँटीजेन  तपासणी शिबीर आयोजित करत आहेत. शहरात जास्त रुग्ण संख्या असलेल्या भागात शिबिर आयोजित करण्यात येत आहेत. उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत कापसे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पोलीस उपाधिक्षक मधुकर जवळकर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर बैठका घेऊन नियोजन आखत आहेत.


उदगीर शहरातील विविध भागांमध्ये नगरपालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने विविध ठिकाणी जलद अँटिजेन तपासणी शिबिरे आयोजित करून तपासण्या करण्यात येत आहेत. शहरातील सर्व व्यापाऱ्यांच्या तपासण्या करण्यात आले असून आता कंटेनमेंट झोनमधील नागरिकांचेही तपासण्या सुरू असल्याचे मुख्याधिकारी श्री राठोड यांनी सांगितले.

(संपादन - गणेश पिटेकर)

loading image
go to top