esakal | नियम तोडला, चाळीस लाखांचा दंड भरला!
sakal

बोलून बातमी शोधा

latur

नियम तोडला, चाळीस लाखांचा दंड भरला!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर: कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेतही (covid 19 second wave) सुरक्षा नियमांची पायमल्ली करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. यात व्यावसायिकांसह नागरिकांचा समावेश आहे. नियमांचे उल्लंघन (corona curfew) करणाऱ्यांकडून तीन महिन्यांत चाळीस लाखांचा दंड वसुल करण्यात आला आहे. यात २५ लाखांचा दंड मास्क न घालता बाहेर फिरणाऱ्यांनी भरला आहे.

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत २३ फेब्रुवारीपासून कोरोना सुरक्षा उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईला सुरवात झाली. गर्दी होणाऱ्या ठिकाणांना प्रशासनाने टार्गेट केले. यासोबत मास्क न घालता फिरणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येऊ लागली. पोलिस व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नियमित कारवाई होऊनही मास्क न घालता फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. यातूनच जिल्ह्याच्या सर्वच भागात मास्क न घालता फिरणाऱ्यांवर मोठ्या संख्येने कारवाई झाली आहे. काही ठिकाणी मंगल कार्यालये व व्यावसायिकांनीही नियमांचे उल्लंघन केल्यानंतर त्यांच्याविरुद्धही दंडात्मक कारवाई झाली. सध्याही ती सुरूच आहे.

हेही वाचा: World No Tobacco Day 2021: काय आहे या दिवसाचं महत्त्व?

२३ फेब्रुवारी ते २५ मेपर्यंत जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था व पोलिसांच्या पथकांनी तीन हजार १४३ ठिकाणी भेटी दिल्या. त्यापैकी २९६ ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले. यात पाच मंगल कार्यालय, बारा शॉपिंग मॉल्स व ५७ व्यावसायिकांचा समावेश आहे. या सर्वांकडून १५ लाख २३ हजार ८५० रुपये दंड वसुल करण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी सांगितले.

उदगीरकरांची अशीही आघाडी-

जिल्ह्यात तीन महिन्याच्या काळात १९ हजार ८९१ जणांनी मास्क न घातल्यामुळे २५ लाख ३२ हजार ७९० रुपये दंड भरला आहे. दंड भरणाऱ्यांत उदगीर तालुक्यातील पाच हजार ३३१, लातूर शहरातील चार हजार ७२१, अहमदपूर- एक हजार ५७३, निलंगा- एक हजार ७८३, औसा- एक हजार ५९२, शिरूर अनंतपाळ- ४०७, चाकूर- ९४८, देवणी- एक हजार २३८, जळकोट- एक हजार ४२० तर रेणापूर येथील एक हजार ५९० जणांचा समावेश असल्याचे उस्मानी यांनी सांगितले.