Corona| एका व्यक्तीला दोन वेगळ्या लस; तीन शिक्षक निलंबित

राष्ट्रीय आपत्तीच्या कामात हलगर्जीपणा करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबन
covid 19
covid 19covid 19

-राहुल मुजमुले

परतूर (जालना): तालुक्यातील श्रीष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या कंपनीच्या लस दिल्या होत्या. आरोग्य विभागाने या प्रकरणाची चौकशी करून केंद्रावर लसीकरण चालू असताना सबंधित शिक्षक यांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व उपाय योजना या कामाबाबतची नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी त्यांची अनुपस्थिती असल्याचे निदर्शनास आल्याने कोविड १९ या राष्ट्रीय आपत्तीच्या कामात हलगर्जीपणा करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबित करण्याचे आदेश दि. १८ मे २०२१ रोजी काढले आहेत.

या आदेशात म्हटले आहे की, आरोग्य विभागाकडून सबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. आरोग्य अधिकारी यांच्या चौकशी अहवालानूसार श्रीष्टी केंद्रातील सहशिक्षक एस.बी. काटे, तसेच एस.बी. सुरनर, एस. बी. सोळंके, यांनी कोविड १९ या राष्ट्रीय आपत्तीच्या कामात हलगर्जीपणा करून कर्तव्यात कसूर केलेला असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करण्यात आला होता. तसेच संदर्भ क्र. ४ चे आदेशान्वये कोविड -१९ या विषाणुचे प्रादुर्भाव रोखणे तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व उपाय योजना या कामाबाबतची नियुक्ती प्राथमिक आरोग्य केंद्र श्रीष्टी येथे शिक्षकांची करण्यात आली होती. परंतू सदर नियुक्तीच्या ठिकाणी संबंधीत शिक्षक अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आल्याने कोविड -१९ च्या लसीकरणात एका लाभार्थ्याला पहिला डोस कोव्हॅक्सीन तसेच दुसरा डोस कोविशिल्ड असा देण्यात आल्याची गंभीर बाब घडलेली होती.

covid 19
Breaking|जालन्यात लाचखोर डीवायएसपी एसीबीच्या जाळ्यात

यावरुन कोविड -१९ या राष्ट्रीय कामात हलगर्जीपणा करून कर्तव्यात कसूर करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, पुर्वपरवानगी न घेता राष्ट्रीय आपत्तीजनक कामात गैरहजर राहणे, सचोटीचे पालन न करणे, वरिष्ठांच्या आदेशांचे उल्लंघन करणे, शासकीय कर्मचाऱ्याला अशोभणीय ठरेल असे वर्तन करणे, जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन करणे, मुख्यालयी वास्तव्यास न राहणे. यावरुन संबंधितांनी उक्त वर्तन हे महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा वर्तणुक नियम १९६७ चे नियम ३ चा भंग केल्याचे सकृतदर्शनी सिध्द झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com