CoronaUpdate: जालना जिल्ह्यात कोरोनाबाधित दोघांचा मृत्यू, ३० जणांना कोरोना

प्रकाश बनकर
Tuesday, 8 December 2020

जालना  जिल्ह्यात सोमवारी (ता.सात) दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर नव्याने तीस कोरोनाबाधितांची भर पडली आहे.

जालना : जिल्ह्यात सोमवारी (ता.सात) दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर नव्याने तीस कोरोनाबाधितांची भर पडली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील ६५ कोरोनाबाधित उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात भर सुरू असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात सोमवारी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ३२६ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

नव्याने ३० कोरोनाबाधितांची भर पडली. यामध्ये एकट्या जालना शहरात १४ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तर तालुक्यातील सावंगी, नेर येथील प्रत्येक दोन, सावंगी तलाव येथील एक, मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील दोन, बदनापूर शहरातील एक, तालुक्यातील कंडारी येथील तीन, जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील एक, भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सुतार, निवडुंगा, थिगळखेडा येथील प्रत्येकी एक व औरंगाबाद जिल्ह्यातील एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आतापर्यंत १२ हजार ६३६ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान सोमवारी, ६५ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. त्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे. परिणामी आतापर्यंत ११ हजार ९२० रूग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात ३९० कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.

जालना कोरोना रुग्ण आकडेवारी
एकूण कोरोनाबाधित ः १२ हजार ६३६
एकूण कोरोनामुक्त ः ११ हजार ९२०
एकूण मृत्यू ः ३२६
उपचार सुरू ः ३९०
 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 30 Cases Recorded In Jalna District