
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गुरुवारी (ता.तीन) ३३ नवीन रुग्णांची भर पडली असून एक जणांचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये गुरुवारी (ता.तीन) ३३ नवीन रुग्णांची भर पडली असून एक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातही बाहेर जिल्ह्यामध्ये बाधित झालेल्या रुग्णाची संख्या सात आहे. तर ३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १५ हजार २०७ इतक्या कोरोनाबाधितांवर उपचार झाले असुन ते सर्वजण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे होण्याचे जिल्ह्यातील रुग्णांचे प्रमाण ९४.९९ टक्के इतके आहे.
जिल्ह्यात सापडलेल्या ३३ रुग्णांचा विचार करता कळंब ११, उस्मानाबाद आठ, परंडा सहा, उमरगा तीन, भूम दोन, तुळजापूर, लोहारा व वाशी या तीन तालुक्यात प्रत्येकी एक जण कोरोनाबाधित झाल्याचे दिसून येत आहे. १४२ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली होती. त्यातील आठ जणांना बाधा झाली आहे. तर २९६ संशयिताची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे. त्यातून १८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. परंडा येथील जाधव गल्ली येथील ८० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर बार्शी येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते.
उस्मानाबाद कोरोना मीटर
एकुण रुग्णसंख्या - १५८३५
बरे झालेले रुग्ण - १५०४२
उपचाराखालील रुग्ण- २४०
एकुण मृत्यु - ५५३
आजचे बाधित - ३३
आजचे मृत्यु - ०१
संपादन - गणेश पिटेकर