esakal | Corona Updates : जालन्यात सध्या ५६ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus-graphic-web-feature.jpg

Corona Updates : जालन्यात सध्या ५६ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : जिल्ह्यात (Jalna) आज गुरुवारी (ता.२२) नव्याने सात रूग्णांची भर पडली. तर सात रूग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात सध्या ५६ कोरोना (Corona) रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात गुरूवारी ९७१ नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी सात नवीन कोरोना रूग्ण निष्पन्न झाले आहेत. यामध्ये जालना शहरातील तीन, तालुक्यात पोखरी, नेर, मंठा (Mantha) तालुक्यातील लोंबोनी, भोकरदन (Bhokardan) तालुक्यात हसनाबाद येथील प्रत्येकी एक कोरोना रूग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आतापर्यंत ६१ हजार ३७२ कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. दरम्यान सात कोरोना रूग्ण उपचारानंतर गुरूवारी कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत ६० हजार १४० कोरोना रूग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. दरम्यान आतापर्यंत कोरोनामुळे एक हजार १७६ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात सध्या ५६ सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.(covid 56 active cases in jalna glp 88)

हेही वाचा: PHOTOS: मराठवाड्यातील नद्यांना पूर; वाहतूक बंद, पिकांचे नुकसान

जालना कोरोना मीटर

एकूण कोरोनाबाधित - ६१,३७२

एकूण कोरोनामुक्त - ६०,१४०

एकूण मृत्यू - ११७६

आजचे मृत्यू - ००

आजचे बाधित - ०७

आजचे मुक्त - ०७

उपचार सुरू - ५६

loading image