Breaking : उस्मानाबाद जिल्ह्यात १२० जणांना कोरोना, चौघांचा मृत्यू

सयाजी शेळके
Tuesday, 18 August 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.१८) तब्बल १२० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, तर चौघांचा मृत्यू झाला असून कळंब तालुक्यात एकाही संशयिताचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला नाही.

उस्मानाबाद : जिल्ह्यात मंगळवारी (ता.१८) तब्बल १२० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, तर चौघांचा मृत्यू झाला असून कळंब तालुक्यात एकाही संशयिताचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला नाही. जिल्ह्यात बाधितांची संख्या शतकाच्या खाली उतरत नाही. मंगळवारी जिल्ह्यातून तब्बल १२० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हा रुग्णालयातून औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तसेच शहरातील उपपरिसरात २३० जणांचे स्वॅब पाठविण्यात आले होते.

वाचा : त्रेचाळीस वर्षांची परंपरा असलेले सम्राट गणेश मंडळ

यापैकी २२३ जणांचे अहवाल मिळाले आहेत. यामध्ये ६५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून ११५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर ४३ अनिर्णित आले असून सात जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात तब्बल ८०४ रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या आहेत. यामध्ये ७४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

परंड्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह
परंड्यातमध्ये स्वॅब टेस्टिंगमध्ये २२, तर अँटीजनमध्ये नऊ जणांचे असे ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. उस्मानाबाद तालुक्यात स्वॅब टेस्टिंगमध्ये पाच, तर रॅपिड अँटीजेनमध्ये २३ जणांचे असे एकूण तब्बल २८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. उमरगा तालुक्यातही २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून तुळजापूर १३, भूम १२, वाशी सहा, तर लोहाऱ्याचे पाच अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. कळंब तालुक्यात मात्र एकही अहवाल पॉझिटीव्ह आलेला नाही.

हेही वाचा : लातूर पालिकेकडे अँटिजेन टेस्ट किटचा तुटवडा; व्यापारी, हमालांची तपासणी लांबली

चौघांचा मृत्यू
नळदूर्ग (ता.तुळजापूर) येथील एका ७० वर्षीय पुरुषाचा, सरमकुंडी फाटा (ता.वाशी) येथील ६५ वर्षीय पुरुष, वाकडी (ता. परंडा) येथील ७० वर्षीय पुरुष आणि गावसूद (ता.उस्मानाबाद) येथील ८० वर्षीय महिलेचा यामध्ये मृत्यू झाला आहे. दरम्यान उपचार घेणाऱ्या ११२ जणांना मंगळवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

 

(संपादन  - गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Cases Increases Osmanabad News