उस्मानाबाद जिल्ह्यात २२ रुग्णांची वाढ, दोघांचा कोरोनामुळे मृत्यू

तानाजी जाधवर
Monday, 30 November 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी (ता.३०) २२ रुग्णांची वाढ झाली असून दोन जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सलग तीन दिवसांमध्ये मृत्यूच्या घटना घडल्याने चिंतेत भर पडली आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यात सोमवारी (ता.३०) २२ रुग्णांची वाढ झाली असून दोन जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सलग तीन दिवसांमध्ये मृत्यूच्या घटना घडल्याने चिंतेत भर पडली आहे. मागच्या तीन दिवसांत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १४ हजार ८९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५६ टक्के एवढे झाले आहे. दोन जणांचा मृत्यु झाला असुन कळंब शहरातील २२ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यु झाल्याची घटनासमोर आली आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये त्या तरुणावर उपचार सुरु होते.

एवढ्या कमी वयामध्ये त्याचा मृत्यू झाल्याने वेगवेगळ्या चर्चा सूरु झाल्या आहेत. तसेच उस्मानाबाद शहरातील शालीमार हॉटेलजवळ राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्धाचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यांच्यावर ही जिल्हा  रुग्णालयामध्ये उपचार सूरु होते. साधारण तीन दिवसांमध्ये मृत्यूचा आकडा वाढल्याने मृत्युदरही वाढल्याचे दिसून येत आहे. ३.६३ टक्के इतका जिल्ह्याचा मृत्युदर झाला आहे. जिल्ह्यात सापडलेल्या २२ रुग्णांपैकी एक जण इतर जिल्ह्यातील असल्याची नोंद आहे.

उस्मानाबाद सहा, कळंब आठ, तुळजापुर दोन, उमरगा एक, लोहारा दोन, वाशी दोन, परंडा एक तर भूममध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही. १६० जणांची स्वॅब चाचणी घेण्यात आली होती. त्यातील १५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ९५ जणाची अँटिजेन टेस्ट करण्यात आली असुन त्यातील सहा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

उस्मानाबाद कोरोना मीटर
एकुण रुग्णसंख्या - १५७४९
बरे झालेले रुग्ण - १४८९३
उपचाराखालील रुग्ण- २८५
एकुण मृत्यु - ५७१
आजचे बाधित - २२
आजचे मृत्यु - ०२

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid New 22 Cases Reported In Osmanabad District, Two Dies