Hingoli Breaking : कळमनुरी तालुक्यातील महिलेला कोरोनाची लागण

Hingoli Corona News
Hingoli Corona News

हिंगोली  : आज रविवारी (ता.पाच) मिळालेल्या अहवालानुसार क्वॉरनटाईन सेंटर ( गावपातळीवरील ) कळमनुरीअंतर्गत एका २३ वर्षीय महिलेला कोविड -१९ ची लागण  झाली आहे. सदरील महिला कळमनुरी तालुक्यातील डिग्रस येथील रहिवासी आहे. औरंगाबादमधून परतली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. आज रोजी प्राप्त माहितीनुसार तलाब कट्टा येथील एक ४५ वर्षीय महिला डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे भरती झाली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सदरील रुग्णाला मधुमेहाचा आजार आहे. आज रोजी कोरोना केअर सेंटर लिंबाळाअंतर्गत तीन कोविड -१९ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

सदरील रुग्ण एक तलाब कट्टा, दोन रिसाला बाजार येथील रहिवासी आहेत. आज नव्याने एक व्यक्तीला कोविड -१९ ची लागण झाल्याचे आढळून आले आहे आणि तीन कोविड -१ ९ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात कोविड १९ चे एकुण २९६ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी २५१ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे व आजघडीला एकूण ४५ रुग्णांवर उपचार चालु आहेत. आयसोलेशन वॉर्ड, जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे ६ कोविड -१९ रुग्ण ( १ रिसाला बाजार , १ मकोडी , २ बहिर्जी नगर , २ गांधी चौक ), डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि कोरोना केअर सेंटर वसमतमध्ये आठ कोविड -१९ रुग्ण (एक बसमत शहर , २ बहिर्जी नगर , १ गणेश नगर , १ दर्गापेठ , १ रिधोरा , २ टाकळगाव) येथील रहिवासी आहे. ते उपचारासाठी भरती आहेत.


कोरोना केअर सेंटर, कळमनुरी येथे एकूण १२ कोविड -१९ रुग्ण ( चार काजी मोहल्ला कळमनुरी , १ कवडा , १ बाभळी , २ विकास नगर , ३ नवी चिखली , १ डिग्रस ) येथील रहिवासी आहेत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असुन कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर कळमनुरी येथे २ कोविड -१९ चा रुग्ण ( १ एसआरपीएफ जवान, १ भोसी औंढा नागनाथ) उपचारासाठी भरती आहेत. कोरोना केअर सेंटर लिंबाळाअंतर्गत ७ कोविड -१९ चे रुग्ण (१ तलाब कट्टा , २ केंद्रा बु , १ प्रगती नगर हिंगोली , २ भांडेगाव , १ पिंपळखुटा) उपचारासाठी भरती आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असुन सद्यःस्थितीला कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. कोरोना केअर सेंटर सेनगाव येथे ६ कोविड -१९चे रुग्ण ( ०१ मन्नासपिंप्री , ०१ ताकतोडा , ०२ केंद्रा बु , ०२ लिंगपिंप्री ) उपचारासाठी भरती आहे. क्वॉरनटाईन सेंटर औंढा नागनाथ येथे ४ कोविड -१९ रुग्ण ( दोन औंढा नागनाथ, दोन भोसी) उपचारासाठी भरती आहेत. हिंगोली जिल्ह्याअंतर्गत आयसोलेशन वार्ड, सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंनटाईन सेंटर अंतर्गत एकूण ५ हजार १२१ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे.

त्यापैकी ४५८९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. चार हजार ३५१ व्यक्तींना घरी सोडण्यात आले आहे. सद्यःस्थितीला ७५९ व्यक्ती भरती आहेत. आज रोजी २६७ अहवाल येणे प्रलंबित आहे. हिंगोलीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घरा बाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घरीच थांबुन मोलाचे सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतु अॅप डाऊनलोड करुन घ्यावे जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधीत रुग्ण असल्यास आपणास सदरील अॅप सतर्क करण्यास मदत करेल असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डाँ श्रीवास यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com