लोहाऱ्यात वीज कोसळली, गायीचा मृत्यू, शेतकरी जखमी ! 

electy.jpg
electy.jpg

लोहारा (उस्मानाबाद) : सलग दुसऱ्या दिवशीही शहरासह तालुक्यातील अनेक भागांत रविवारी (ता.२०) दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, वीज कोसळल्याने गाय मृत्यूमुखी पडली. तर ४१ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. त्यांना उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना हिप्परगा (रवा) शिवारात दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडली.

मागील आठ दिवसापासून तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. मात्र शनिवारी (ता. १९) दुपारी दीडच्या सुमारास शहरासह तालुक्यातील अनेक भागांत एक तास मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर तीन तास मध्यमस्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले प्रवाहीत झाले. सलग पडणाऱ्या पावसामुळे बहुतांश शेती पाण्याखाली गेली आहे. अनेकांचे बांधबंधारे फुटून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाला आलेल्या सोयाबीन पिकांची प्रचंड हाणी झाली आहे. सुमारे २० हजार हेक्टरवरील सोयाबीन पिकांची नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

सतत पडणाऱ्या पावसामुळे वित्त हानी बरोबरच आता जीवित हानी होऊ लागली आहे. शनिवारी मुसळधार झालेल्या पावसानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.२०) दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत मेघ गर्जनेसह मोठा पाऊस झाला. तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील शिवारात वीज कोसळल्याने हणुमंत किसन चिंचोळी यांची दुभती गाय मृत्यूमुखी पडली. तर रवींद्र नगराळे (वय ४१) हे शेतकरी भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत. येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणले होते. परंतु प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com