आता कुठे गेला गायींबाबतचा कळवळा?

वडोद बाजार - विक्रीसाठी बाजारात आणलेली जनावरे.
वडोद बाजार - विक्रीसाठी बाजारात आणलेली जनावरे.

औरंगाबाद - गोवंशाचा आदर करा, गोवंश हत्या करू नका, शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करा, अशा सल्ल्यांचे डोस देणारे, गायींविषयी कळवळा व्यक्त करणारे सरकार खुट्यांवरच पशुधन तडफडत असताना चारा छावण्या उभारण्यासाठी तत्परता का दाखवीत नाही, असा संतप्त सवाल बळिराजा उपस्थित करीत आहे.

शासन दरबारातून फर्मान सुटल्यामुळे मंत्री दुष्काळाची पाहणी करीत आहेत. त्यांना शेतकऱ्यांची हतबलता दिसत नाही का? दुष्काळ जाहीर करण्याचे पारंपरिक मुहूर्त शोधण्यापेक्षा तो जाहीर करण्याची आवश्‍यकता आहे अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

तीन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे खरिपाचे पीक गेले, रब्बीचीही हीच स्थिती असल्यामुळे यंदाचा दुष्काळ दिवाळीपूर्वीच सुरू झाला आहे. मराठवाड्यात जिथे माणसांना पिण्याचे पाणी नाही, तिथे जनावरांचा सांभाळ कसा करायचा, या चिंतेने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com