सात मुलींनी केले आईवर अंत्यसंस्कार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

पिशोर - आई किंवा वडील यांच्या चितेस मुलाने मुखाग्नी देण्याची प्रथा आहे; परंतु आईच्या निधनानंतर सात मुलींनी अंत्यसंस्कार करून क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. तिरडीला खांदा देण्यापासून ते चितेला मुखाग्नी देण्यापर्यंतचे सर्व विधी त्यांनीच केले. नव्वद वर्षांच्या वृद्ध मातेला मोठ्या बासष्टवर्षीय वृद्ध मुलीने मुखाग्नी दिला. तेव्हा उपस्थित सर्वजण हेलावले. 

एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही घटना शनिवारी पिशोर (ता. कन्नड) येथे घडली. पिशोरमधील शफेपूर भागातील मंडाबाई विठ्ठल मोकासे (वय 90) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी निधन झाले. मंडाबाईंना सात मुली आहेत. याशिवाय सावत्र दोन मुली आणि दोन सावत्र मुलगे आहेत. मंडाबाईंचे पती विठ्ठल मोकासे यांचे सात वर्षांपूर्वी निधन झाले. सात मुलींनीच त्यांचाही सांभाळ केला. मंडाबाई यांच्या निधनानंतर 

मोठी मुलगी अहिल्याबाई बाजीराव बोराडे यांनी आईच्या पार्थिवास मुखाग्नी दिला. 
अहिल्याबाई बोराडे (उंडणगाव), लीलाबाई धनवाई (पारध), आशाबाई धनवाई (पिशोर), रेखाबाई बलक (नागपूर), संगीताबाई सुरडकर (तळनेर), जनाबाई नरोडे (जमुनावाडी), सरलाबाई डोईफोडे (उंडणगाव) या सहा मुलींनी आईच्या तिरडीला खांदा दिला. 

Web Title: Cremation on the mother by seven daughters

टॅग्स