माहूरच्या नगराध्यक्षासह 36 जणांविरुद्ध गुन्हा

बालाजी कोंडे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

माहूर : शासकीय रकमेचा अपहार करून फसवणूक केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी यांच्यासह ३६ जणांविरुद्ध गुन्हा काल (सोमवार) मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. 

माहूर शहरातील व्यापारी संकूल लिलाव प्रक्रियेमध्ये अनियमितता असल्याचा आरोप झाला होता. संगनमत करून कट रचत शासनाची आणि जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप या पदाधिकार्‍यांवर होता. या प्रकरणी माहूर येथील न्यायालयाने कारवाईचे आदेश दिल्यानंतर ३६ जणांविरुद्ध माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यात दोसाणी, भोपी यांच्यासह आठ नगरसेवक, २५ व्यापारी आणि मुद्रांक विक्रेत्यांचा समावेश आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक शिवलिंग बळीराम टाकळीकर यांनी तक्रार दाखल केली होती. याचा तपास पोलिस निरीक्षक अभिमन्यू सोळंके करत आहेत.

Web Title: Crime against 36 people including Mahur's Mayor