जनावरांची सुटका करून सात कसायांवर गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

औरंगाबाद - अवैधरीत्या कत्तल करणाऱ्या कसायांच्या विरोधात महापालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. पोलिसांनी 34 जनावरांचे मांस व कातडी जप्त केली. तर चिकलठाणा येथे 25 जनावरांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी तब्बल सहा जणांविरोधात गुन्हे दाखल केले.

शहरामध्ये विविध ठिकाणी जनावरांची बेकायदा कत्तल करण्यात येत असल्याने पोलिस आणि महापालिका प्रशासनातर्फे पहाटे चारपासून सिल्लेखाना व चिकलठाणा भागात धडक कारवाई करण्यात आली.

सिल्लेखाना भागात पोलिसांच्या फौजफाट्यासह छापा मारण्यात आला. त्यावेळी कसाई मुश्‍ताक अजिज कुरैशी याच्या चामड्याच्या गोदामातून 18 गोवंश जनावरांची चामडी जप्त करण्यात आली. तर इब्राम फत्ते मोहम्मद कुरैशी यांच्या गोदामातून सातशे किलो गोवंशाचे मांस जप्त केले.

त्याचप्रमाणे वहाब अब्दुल हसन कुरैशी यांच्या गोदामातून सोळा जनावरांची कातडी जप्त केली. तर वशीम अजीज कुरैशी याच्या गोदामातून सहा जनावरांची चामडी जप्त करण्यात आली. या प्रकरणी अवैध कत्तलविरोधी पथकाचे प्रमुख अनंत जाधव यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सुरू असतानाच पोलिस निरीक्षक श्रीकांत परोपकारी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आणि महापालिकेच्या पथकाने चिकलठाणा येथे छापे मारले. येथील कुरैशी मोहल्ल्यातील दोन ठिकाणी छापे मारले, एका कारवाईत 50 हजार रुपये किमतीची सहा जनावरे आणि दुसऱ्या कारवाईतील दीड लाख रुपये किमतीची 19 अशी दोन लाख रुपये किमतीची 25 जनावरे कत्तल करण्यासाठी बांधून ठेवलेली आढळल्याने पोलिसांनी सर्व जनावरांची सुटका केली. त्यानंतर जफर कुरैशी (रा. पुष्पक गार्डन, चिकलठाणा) आणि जफर सत्तार कुरैशी व हरुण गफ्फार कुरैशी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

Web Title: crime in aurangabad