लग्न तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

औरंगाबाद - भावी वधूसंबंधी अश्‍लील मजकूर भावी वराच्या मोबाईलवर टाकून लग्न तोडण्याचा प्रयत्न करणाराविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. पाच) गुन्ह्याची नोंद झाली.

औरंगाबाद - भावी वधूसंबंधी अश्‍लील मजकूर भावी वराच्या मोबाईलवर टाकून लग्न तोडण्याचा प्रयत्न करणाराविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. पाच) गुन्ह्याची नोंद झाली.

मुकर्रम (नाव बदलले आहे) यांनी तक्रारीत नमूद केले, की त्यांच्या मुलीचे एका तरुणाशी लग्न ठरले. ही बाब एका व्यक्तीला माहिती झाली. तिने लग्न तुटावे यासाठी मुकर्रम यांच्या मुलीसंबधी भावी जावयाला मोबाइलद्वारे अश्‍लील मेसेज टाकला. बदनामी व्हावी हा उद्देश त्या व्यक्तीचा होता. यासंबंधीची माहिती भावी जावयाने मुकर्रम यांना दिली. त्यानंतर मुकर्रम यांनी हर्सूल पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद झाली.

Web Title: crime in aurangabad