उस्मानाबाद - सहा बँकांच्या शाखांविरोधात शासनाकडून गुन्हे दाखल

तानाजी जाधवर
बुधवार, 27 जून 2018

उस्मानाबाद : शेतकऱ्यांच्या कर्जवाटपास विलंब करणाऱ्या जिल्ह्यातील सहा बँकांच्या शाखांविरोधात शासनाकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कळंब, वाशी तालुक्यातील प्रत्येकी तीन अशा सहा शाखांच्या व्यवस्थापकावर हा गुन्हा दाखल करण्यात आले.

उस्मानाबाद : शेतकऱ्यांच्या कर्जवाटपास विलंब करणाऱ्या जिल्ह्यातील सहा बँकांच्या शाखांविरोधात शासनाकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कळंब, वाशी तालुक्यातील प्रत्येकी तीन अशा सहा शाखांच्या व्यवस्थापकावर हा गुन्हा दाखल करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. 26 ) पिककर्ज वाटपाच्या बाबतीत आढावा घेतला होता. त्यानुसार यामध्ये अनेक बँकानी अनेकवेळा सूचना देऊनही याबाबतीत काहीच कार्यवाही केलेली नसल्याचे बैठकीत पुढे आले. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बँकांच्या शाखा व्यवस्थापकाविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे सहकार विभागाला आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी रात्री उशीरा पाच तर बुधवारी (ता. २७) सकाळी एका शाखेच्या विरोधात गुन्हे दाखल केले. कलम 188 नुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यामध्ये लोकसेवकांच्या आदेशाचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ज्या बँकेच्या शाखेनी एक टक्क्यापेक्षा कमी पिककर्ज वाटप केले आहे, अशा शाखांवर ही कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये कळंब तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाची कळंब, अंदोरा, मंगरुळ या शाखांचा समावेश आहे.  वाशी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पारगाव, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तेरखेडा या शाखांच्या विरोधात तालुका सहायक निबंधकांनी पोलिस ठाण्यामध्ये जाऊन  फिर्याद दिली आहे. त्यानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यानी दिली.

Web Title: crime file against 6 district banks in osmanabad