डिजे वाजविल्याप्रकरणी भोकरमध्ये 20 जणांवर गुन्हे

डिजे वाजविल्याप्रकरणी भोकरमध्ये 20 जणांवर गुन्हे

नांदेड : गणरायाला निरोप देणाऱ्या अतिउत्साही गणेशमंडळांवर डीजे वाजविल्याप्रकरणी भोकर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. तेलंगणातील डीजे चालक व मालकांना अटक करून डीजे जप्त केले. या घटना पाळज आणि किनी गावात घडल्या होत्या. 

जिल्ह्यात सर्वच ठिकाणी डीजेमुक्त गणेशाला निरोप देण्यात आला. परंतु भोकर तालुक्यातील पाळज व किनी या दोन गावात गणेशभक्तांनी तेलंगणातील डीजे लावून गणरायाला निरोप दिला खरा. मात्र त्या मंडळाच्या पदाधिकारी व डीजे चालक मालकांवर पोलिस ठाण्यत गुन्हे दाखल करण्यात आले. पाळज येथील पाच गणेश मंडळांनी विनापरवानगी डीजे लावून ध्वनी प्रदुषण केले.

तसेच जिल्हाधिकारी आणि उच्च न्यायालयाचे आदेश धुडकावले. महिला फौजदार पी. एम. सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन प्रसाद गंगाधर मारगान तेलंगणा (डीजे चालक व मालक), श्रीनिवास नरसय्या आवधुतराव, श्रीकांत साईनाथ आनदेवाड, बालाजी पुंडलीक पेंटेवाड, गणेश रामलु आनमोड, श्रीनिवास राजेश्‍वर महादवाड, राजेश शंकर ठाकूर, साईनाथ नारायण तिपावाड, अनिल बाबु बडगुलवार, संतोष नागनाथ पेंटेवाड, ईश्‍वर ठाणटायर, मारोती आडेलु, गंगाधर जुक्कलवाड, गणेश नरसय्या अवधुतराव आणि भोजन्ना पळशीकर यांच्यासह आदींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच किनी येथील गंगाधर सुनील देवानंद तिम्मापुरे, नरेश रेड्डी दासा रेड्डी आणि महिंद्रा पीकअप (पीएच 04-युए-7667) वर लावलेला डीजे चालक व मालक यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com