मराठा आरक्षणावर शिक्षकाचे बेजबाबदार व्यक्तव्य, गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

औरंगाबाद : जिल्ह्यातील मनूर (ता. वैजापूर) येथील जिल्हा परिषद शाळेत दहावीच्या वर्गात शिकविताना मराठा आरक्षणाबाबत बेजबाबदार विधान केल्याप्रकरणी दिलीप हिरामन गायकवाड (वय 47) या शिक्षकाविरूद्ध भादवि कलम 107 अन्वये गुरूवारी दुपारी दोन वाजता गुन्हा दाखल झाला.

बुधवारी (ता.25) दुपारी साडेतीनला शिक्षकाने बेजबाबदार विधान केले होते. शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांनी घरी ही बाब पालकांना सांगितली. गुरूवारी साडेनऊला शाळेसमोर जमाव जमला होता. पोलिसांनी तातडीने शिक्षकास ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले व गुन्हा दाखल केला.

Web Title: crime filed against teacher for talks negative about maratha reservation