उच्चभ्रू वसाहतीत चालणाऱ्या सेक्स रॅकेटवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 5 जुलै 2019

यापूर्वीही झाली होती संशयिताला अटक 
संशयित तुषार राजपूत याला यापूर्वीही गुन्हे शाखेने अटक केलेली आहे. ऑनलाइन देहव्यापारातही यापूर्वी तो सक्रिय होता. तत्कालीन पोलिस आयुक्तांनी या व्यापाराबद्दल त्याला तंबीही दिली होती. व्हॉटस्‌ॲप व सोशल साइटच्या माध्यमातून हा ‘उद्योग’ सुरू होता. गरीब आणि गरजू मुलींनाही पैशासाठी या व्यवसायाच्या जाळ्यात ओढत होता, अशी माहिती पोलिस तसेच सूत्रांनी दिली.

औरंगाबाद - सातारा परिसरातील एका उच्चभ्रू वसाहतीत चालणाऱ्या कुंटणखान्याचा पुंडलिकनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. याठिकाणी छापा मारून कुंटणखाना चालविणाऱ्या एका महिलेसह दोन मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे.

सातारा परिसरातील एका रो-हाऊसमध्ये वेश्‍या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांना मिळाली होती. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक विकास खटके यांचे पथक तयार करून याठिकाणी गुरुवारी (ता. चार) सायंकाळी एक पंटर पाठविला. पंटरला एका दलालाने रो-हाऊसमध्ये नेले. दलालाने पैसे घेऊन मुलींजवळ सोडताच काही वेळात पोलिस उपनिरीक्षक खटके, रमेश सांगळे, पोलिस नाईक बाळाराम चौरे, पोलिस शिपाई शिवाजी गायकवाड, जालिंदर मांटे, विलास डोईफोडे, राजेश येदमळ, दीपक जाधव, महिला शिपाई नंदा गरड, नंदा तिडके यांनी छापा मारला. याठिकाणी असलेल्या दोन मुलींसह कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तुषार राजू राजपूत (३५, रा पेन्शनपुरा, छावणी), प्रवीण बालाजी कुरकुटे (३५, रा. अलोकनगर, बीड बायपास) अशी आरोपींची नावे आहेत. ४५ हजार ५०० रुपये याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास पोलिस निरीक्षक अनिल आडे करीत आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलिस उपायुक्त राहुल खाडे, सहायक पोलिस आयुक्त जी. एस. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime on Highprofile Sex Racket by Police