नांदेड : तलवारीचा धाक दाखवून दाम्पत्याला लुटले

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 8 मे 2018

अनिकेत अडकटलवार हे आपल्या पत्नीसोबत ई स्क्वेअर चित्रपटगृहात गेले होते. रात्रीचा शो संपल्याने ते कॅनाल रस्त्याने आपल्या दुचाकीवरुन घराकडे परतत असतांना तोंडाला पट्टी बांधुन तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला. र

नांदेड : कॅनाल रस्त्यावर एका दाम्पत्याला अडवून तलवारीचा धाक दाखवून लुटले. चोरट्यांनी एक लाख १९ हजाराचा एेवज लंपास केला. ही घटना भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (ता. सात) रात्री अकरा वाजता घडली.

अनिकेत अडकटलवार हे आपल्या पत्नीसोबत ई स्क्वेअर चित्रपटगृहात गेले होते. रात्रीचा शो संपल्याने ते कॅनाल रस्त्याने आपल्या दुचाकीवरुन घराकडे परतत असतांना तोंडाला पट्टी बांधुन तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला. रस्त्यात त्यांची गाडी अडवून तलवार मानेवर ठेवून त्यांच्याजवळचे मोबाईल, सोन्याच्या अंगठ्या, पत्नीचे दागिणे आणि रोख दहा हजार रुपये असा एक लाख १९ हजार रुपयाचा एेवज जबरीने काढून घेतला.

या चोरट्यांनी त्यांना मारहाण केली. यात श्री. अडकटलवार यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर शासकिय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. श्री. अडकटलवार यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार श्री. ढेमकेवाड हे करीत आहेत. 

Web Title: crime incident in Nanded

टॅग्स