न्यायाधीशास धमकावणाऱ्या वकिलाला तुरुंगाची हवा

Crime
Crime

औरंगाबाद - आरोपीला शिक्षा सुनावू नये यासाठी एका वकिलाने थेट न्यायाधीशांनाच धमकावले. या प्रकरणी रामचंद्र कागणे (वय 67) या वकिलाला एका आठवड्याची साधी कैद व पाच हजार रुपये दंडाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश टी. व्ही. नलावडे व न्यायाधीश विभा व्ही. कंकणवाडी यांनी दिला. दंड न भरल्यास कागणेला आणखी दोन दिवस तुरुंगात राहावे लागेल.

हा निकाल लागताच न्यायालयात हजर असलेल्या कागणे यांना लागलीच ताब्यात घेऊन तुरुंगात रवानगी करण्यात आली. तब्बल 12 वर्षांनी ही शिक्षा झाली आहे. परभणीचे तत्कालीन हंगामी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक गोविंदराव बिलोलीकर यांनी 7 ऑक्‍टोबर 2005 रोजी कागणे यांच्या अशिलास बलात्काराबद्दल दोषी ठरविले होते. याच वेळी कागणे अचानक आरडाओरडा करत न्यायासनाकडे धावत गेले व स्टेनोची वही भिरकावली होती ती वही सरकारी वकिलाच्या डोक्‍यावर आदळली. शिपायाने ती वही उचलून स्टेनोला दिली. पण कागणे यांनी ती हिसकावून घेत पुन्हा भिरकावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com