माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

औरंगाबाद - मराठा समाजातील मुलींबाबत पद्मश्री सन्मानित "उपराकार' लक्ष्मण माने यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे क्रांती चौक पोलिस ठाण्यात देण्यात आले. गुन्हा दाखल करण्यासाठी त्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे.

निवेदनात म्हटले, की, पुणे येथे झालेल्या ओबीसी जागरण परिषदेत माने यांनी आक्षेपार्ह विधान केले. मुळात पाटील ही जात नसून, पद आहे. सर्व जातीधर्मांत पाटील आहेत. आज हे पद आडनाव म्हणून वापरले जाते.

त्यामुळे माने यांचे विधान सर्वच जातीधर्मांतील महिलांची बदनामी करणारे आहे. माने यांच्यावर यापूर्वीही महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आजपर्यंत त्यांचे सामाजिक व साहित्य क्षेत्रातील कार्य पाहून त्यांच्या वादग्रस्त विधानाकडे दुर्लक्ष केले; पण आताचे विधान समस्त स्त्रियांचा अपमान करणारे आहे. त्यामुळे मानेंवर भारतीय दंड विधानाप्रमाणे गुन्हा दाखल करावा.

Web Title: Crime Laxman Mane