एमआयएमच्या गटनेत्यांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

औरंगाबाद - न्यायालयाच्या आदेशानुसार बंद असलेल्या सलीम अली सरोवराचे गेट एमआयएम पक्षाचे महापालिकेतील गटनेते नासेर सिद्दिकी यांनी तोडल्याचा प्रकार मंगळवारी (ता. एक) घडला. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. दोन) गुन्ह्याची नोंद झाली.

ऐतिहासिक सलीम अली सरोवराचे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून सुशोभीकरण केले. या ठिकाणी बोटिंग सुरू करण्याचा महापालिकेचा विचार होता. त्याला पक्षीमित्र संघटनांनी आक्षेप घेत याचिका न्यायालयात दाखल केली. तेव्हापासून सरोवरात प्रवेशबंदी आहे; परंतु सरोवर सर्वसामान्यांसाठी खुले करावे, अशी मागणी करून एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी कुलूप तोडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मंगळवारी गटनेता नासेर सिद्दिकी व कार्यकर्त्यांनी सलीम अली सरोवरावर धडक देऊन मुख्य प्रवेशद्वार कटरने कापून काढले. गेटवर चढून वायरचे नुकसान केले. 

याप्रकरणी महापालिकेने न्यायालयाचा अवमान केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. त्यानुसार नासेर सिद्दिकी व इतर शंभर कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. यानंतर पोलिस बंदोबस्तात सरोवराचे प्रवेशद्वार पुन्हा बसविण्यात आले.

Web Title: crime on MIM group leader