आमदार भांबळेंविरुद्ध शिवीगाळप्रकरणी गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

सेलू - देना बॅंक शाखेच्या अधिकाऱ्यास शिवीगाळ केल्याप्रकरणी जिंतूरचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे.

सेलू - देना बॅंक शाखेच्या अधिकाऱ्यास शिवीगाळ केल्याप्रकरणी जिंतूरचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे.

देना बॅंकेचे सेलू शाखाधिकारी गौतम विश्वनाथ घोडके यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आमदार भांबळे व त्यांचे दहा ते बारा सहकारी शनिवारी (ता. 7) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास शाखेत आले. त्या वेळी भांबळे यांनी शिवराळ भाषेत शिवीगाळ केली, पैसे खाऊन कामे करतोस काय, थकीत कर्जदार अशोक गाडेकर यांच्या कामाचे काय झाले, असे म्हणून मारण्याची धमकी दिली. बॅंकेच्या इतर कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगून दोन दिवसांत काम नाही झाले तर तुला बघून घेईन, अशी धमकी दिली. टेबलावरील फाइल खाली फेकून दिली. घोडके यांच्या तक्रारीनुसार आमदार भांबळे यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आज सायंकाळी पावणेसातला गुन्हा दाखल झाला. दरम्यान, शाखाधिकाऱ्यास शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी आज दिवसभर कामकाज बंद ठेवले.

Web Title: crime on mla vijay bhambale