वजिराबाद हद्दीत मटका तेजीत; तीन ठिकाणी छापे

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

वजिराबाद ठाण्याच्या हद्दीत मटका चालकांनी पोलिसांना खुलेआम आव्हान देत वेगवेगळ्या भागात आपली दुकानदारी सुरू केली आहे. पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशावरून तीन ठिकाणी छापा टाकला. यावेळी दहा हजार रुपये जप्त करून सहा जणांना अटक केली. 

नांदेड : वजिराबाद ठाण्याच्या हद्दीत मटका चालकांनी पोलिसांना खुलेआम आव्हान देत वेगवेगळ्या भागात आपली दुकानदारी सुरू केली आहे. पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशावरून तीन ठिकाणी छापा टाकला. यावेळी दहा हजार रुपये जप्त करून सहा जणांना अटक केली. 

पोलिस उपाधिक्षक (शहर) अभिजीत फस्के आणि वजिराबाद ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना सुचना करून हद्दीत कुठलाच अवैध धंदा चालू देऊ नका. तसेच असे प्रकार जर आढळले तर संबंधितावर कडक कारवाई करा असे बीट हवालदार यांचे कान टोचताच हद्दीत तीन कल्याण नावाच्या मटका अड्डयावर सोमवारी (ता. 27) दुपारी कारवाई करण्यात आली. यात पोलिस नाईक जसपालसिंग कालो यांनी चिखलवाडी कॉर्नर येथील अड्ड्यावर छापा टाकला. डावावरुन शेख अल्ताफ शेख छोटूमीया रा. दुलेशहानगर आणि महेबुब खान नजीरखआन रा. गवळीपूरा या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून रोख 5 हजार 90 रुपये जप्त केले. तपास पोलिस नाईक कौडेकर हे करीत आहेत. 

दसऱ्या छाप्यात हिंगोली गेट उड्डाण पुलाजवळ लक्झरी पॉईंट येथे पोलिस उपनिरीक्षक किरण पठारे यांनी छापा टाकला. त्यांनीही कल्याण नावाच्या मटका अड्ड्यावरून निकेस नारायण आलमखाने रा. अबचलनगर आणि विजय रामचंद्र मडगीरवार रा. बजरंग कॉलनी या दोघांना अटक केली. डावावरून अडीच हजार रुपये जप्त केले. या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक दामेकर हे करीत आहेत. 

तर तिसरा छापा पोलिस नाईक गजानन किडे यांनी पक्कीचाळ भागात टाकला. यावेळी कल्याण नावाच्या मटका अड्ड्यावरून दत्ता चांदु वाढवे रा. कल्याणनगर आणि अजींक्यराज अशोकराज कांबळे यांना अटक केली. त्यांच्याविरूध्द वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तपास वाजीद हे करीत आहेत.

Web Title: crime news in nanded district