बैलजोडी खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे चोरले; ३ जणाविरुध्द गुन्हा दाखल

कुंभारपिंपळगाव येथील घटना; आठवडी बाजाराच्या बाहेर नेऊन धक्काबुक्की करुन दोन लाख रुपये हिसकावून नेल्यांची घटना
crime news Steals money farmers who buy bulls Crimes filed against 3 persons jalna
crime news Steals money farmers who buy bulls Crimes filed against 3 persons jalnaesakal

घनसावंगी : पिरगँबवाडी ता.घनसावंगी येथील शेतकऱ्यांस बैलजोडी विक्री करायची आहे असे सांगून आठवडी बाजाराच्या बाहेर नेऊन धक्काबुक्की करुन दोन लाख रुपये हिसकावून नेल्यांची घटना बुधवार (ता.२५) दुपारी कुंभारपिंपळगाव ते तिर्थपुरी रस्त्यावर घडली या प्रकरणी तीन जणाविरूध्द घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिरगँबवाडी ता.घनसावंगी येथील शेख मतीन शेख अयुब ( वय 30 वर्षे) हे शेती व्यवसाय करतात सध्या शेतीचे काम चालू असल्याने त्यांनी बैलजोड़ी व म्हैस आणण्यासाठी घोन्सी बुद्रुक येथील पोलीस पाटील शेख पाशा यांच्याकडून हात उसने सत्तर हजार रुपये व स्वतःच्या शेतातील कांद्याचे एक लाख तीस हजार रुपये असे एकुण दोन लाख रुपये घेऊन बुधवार (ता.25) सकाळी दहा वाजेच्या सुमारास पिरगँबवाडी येथून मोटार सायकलवर कुंभारपिंपळगाव येथे आठवडी बाजारामध्ये बैलाची जोड विकत घेण्यासाठी गेले.

येथील खरेदी विक्री संघाच्या जवळ बैलाच्या बाजारामध्ये एका लिंबाच्या झाडाखाली बसलेला अंदाजे 55 वर्ष वयोगटातील एक अनोळखी व्यक्ती अंगाने झाडजुड, रंग उंची 06 फुट अंदाजे अशा वर्णनाचा माणूस येवून माझ्या कडे बैल असून पाहण्यासाठी चला असे सांगून मोबाईल फोनमधील बैल जोडीचा फोटो दाखवून सदर बैल जोड ही कुंभार पिंपळगाव ते तिर्थपुरी जाणाऱ्या रोडलगत पडीत असलेल्या जमीन येथे आहे असे सांगितल्याने मोटार सायकलवर बसुन सदर बैलजोडी पाहण्यासाठी जात असताना कुंभार पिपळगाव येथील शिवबा हाँटेलपासुन तिर्थपुरीकडे जाणान्या रोडवर अंदाजे 300 मिटर अंतरावर गल्यानंतर समोर रोडवर दोन अनोळखी इसम थांबलेले होते त्यांच्याजवळ जाताच मोटार सायकलवर बसलेल्या इसमाने मोटार सायकल रोडच्या बाजूस घेऊन थांबण्यास सांगितली.

मोटार सायकल थांबवून खाली उतरली असता पाठीमागे बसलेल्या इसमाने शेख मतीन यांच्या कमरेला मिठी मारली व समोर उभे असलेल्या दोन इसमानी धक्काबुक्की करून त्यांच्या खिशातील नगदी दोन लाख रुपये घेऊन पसार झाले या प्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात तीन जणाविरुध्द बुधवार (ता.२५) गुन्हा दाखल कराण्यात आला आहे पुढील तपास पोलीस जमादार श्यामसुंदर देवडे हेकरीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com