Crime News : चोरीला गेलेल्या वीस मोबाईलचा लागला शोध; सायबर पोलिसांची कामगिरी | | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Crime News : चोरीला गेलेल्या वीस मोबाईलचा लागला शोध; सायबर पोलिसांची कामगिरी

जालना : चोरी गेलेले व हरवलेले वीस मोबाईल सायबर पोलिसांनी सीईआयआर पोर्टलद्वारे शोधण्यात यश आले आहे. सुमारे तीन लाख ९३ हजार ३६६ रुपयांचे हे वीस मोबाईल शुक्रवारी (ता. दोन) पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते तक्रारींना सुपूर्द केले आहेत.

केंद्रीय दूरसंचार विभागाकडून सीईआयआर ही प्रणाली सुरु करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये चोरी गेलेले व हरवलेले मोबाईल तक्रारदार यांना परत मिळवून देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात वेगवेगळया पोलिस ठाणेच्या हद्दीत चोरी गेलेले व हरवलेले मोबाईलच्या तक्रारी सीईआयआर पोर्टलवर सायबर पोलिसांच्या मार्फत तक्रार दाखल केली.

सीईआयआर पोर्टल करून चोरी गेलेले व हरवलेले मोबाईलचे प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून पोर्टलवरील प्राप्त तक्रारी पैकी एकूण वीस तक्रारीमध्ये तीन लाख ९३ हजार ३६६ रुपयांचे वीस मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणावरून प्राप्त केले.

ही वीस मोबाईल तक्रारदार गणेश विठ्ठल पिसुले, कृष्णा बलिराम घोटणकर, आकाश रवि मोरे, वैभव बाबासाहेब म्हस्के, रुचिता मंगे, भीमराव मुंढे, आदर्श एखंडे, आझम बेग नवाब बेग, किरणकुमार गायकवाड, लखन चित्ते, निरज सिंघी, अर्जुन निकाळजे, अंहर बेग जाणुजी निकाळजे, दिक्षा भटकर, शरद भालेराव, परमेश्वर मदन, प्रफुलबेकर अंबेकर, वैष्णवी शेरकर यांना पोलिस अधीक्षक तुषार देशी यांच्या हस्ते परत देण्यात आला आहे.

ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याची पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश कासुळे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी देशमुख, अंमलदार लक्ष्मीकांत आडेप, संदीप मांटे, किरण मोरे, सुनील पाटोळे, दिलीप गुसिंगे, गजानन मुरकुटे, महिला अंमलदार संगीता चव्हाण यांनी केलेली आहे.

ऑनलाइन फसवणूक झालेले पैसे परत

अरुणा रमेश फुलमामडीकर यांचे ता. ३१ मे रोजी ऑनलाइनद्वारे गुगलवर शैक्षणिक चौकशी करीत असताना ३३ हजार रुपयांची फसवणूक झाली होती. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून संबंधित बँकेला पत्रव्यवहार करून २५ हजार रुपयांची परत मिळविले.

टॅग्स :JalnaCrime Newsmobile