अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

गेवराई (जि. बीड) - तालुक्‍यातील साठेवाडी येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या छेडछाडप्रकरणी शनिवारी (ता. 28) चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

धर्मराज अप्पासाहेब अनभुले (वय 24, रा. साठेवाडी, ता. गेवराई, जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. घरासमोरील प्रांगणात एकटीच खेळत असलेल्या मुलीचे त्याने छेड काढली. पीडित मुलीने आरडाओरड केल्याने आरोपीने पळ काढला.

दरम्यान, या घटनेची माहिती पीडित मुलीने शेतातून घरी आलेल्या आई-वडिलांना दिली. यानंतर चकलांबा पोलिस ठाण्यात संशयित आरोपी धर्मराज अप्पासाहेब अनभुले याच्याविरुद्ध विनयभंग तसेच बाललैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime at police station for molesting student