'शुभकल्याण मल्टीस्टेट’ संचालकांविरोधात बीडमध्येही गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

बीड : जादा व्याजदर व कमी कालावधीत रक्कम दुप्पट, तिप्पट करण्याचे अमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या हावरगाव (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील शुभकल्याण मल्टीस्टेटच्या संचालकांविरोधात बीडमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. 

'शुभकल्याण' मल्टीस्टेटच्या संचालकांविरोधात यापूर्वी अंबाजोगाई, केज, नेकनूर, माजलगाव, परळी, गेवराई, वडवणी, आष्टी, धारुर शाखेतील ठेवीदारांनी गुन्हे नोंद केलेले आहेत. त्यानंतर आता मंगळवारी (ता. 15) रात्री उशिरा बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

दिलीप आपेट अध्यक्ष असलेल्या शुभकल्याण मल्टीस्टेटच्या जिल्ह्यात बहुतेक तालुक्यांच्या ठिकाणी शाखा होत्या. ग्राहकांना विविध अमिषे दाखवून ठेवी जमा करण्यात आला. मात्र, वेळेवर पैसे परत केले नाही. ग्राहकांची फसवणूक केल्यावरुन दिलीप अपेटसह, संचालक भास्कर शिंदे, अजय आपेट, नागिनी शिंदे, विजय आपेट, कमलाबाई नखाते, शालिनी आपेट, अभिजित आपेट, प्रतिभा आंधळे, आशा बिरादार, बाबूराव सोनकांबळे तसेच शाखाधिकारी व इतर कर्मचारी यांचा आरोपींत समावेश आहे.

शेख फरजाना अबुतालीब (रा. बालेपीर, बीड) यांनी ही फसणूवक झालेल्या ग्राहकांच्या वतीने एकत्रीत फिर्याद दिली. फसवणूक व विश्वासघाताची कमले संचालकांवर लावण्यात आली आहेत. दरम्यान, आतापर्यंत या संचालकांविरोधात फसवणूकीचे 10 गुन्हे नोंद झाले असून एकही गुन्ह्यात आरोंना अटक करण्यात आलेली नाही. 
 
Web Title: crime register against director of shubhakalyan multistate