नांदेड जिल्ह्यात खून, बलात्कार, घरफोडीत घट 

प्रल्हाद कांबळे
रविवार, 6 जानेवारी 2019

पोलिस स्थापना दिन आणि पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजीत पत्रकार परिषदेत डॉ. अक्षय शिंदे यांनी ही माहिती दिली. यावेळी प्रभारी पोलिस उपाधिक्षक (मुख्यालय) प्रशांत देशपांडे, जनसंपर्क अधिकारी अशओक लाटकर यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात सन २०१७ पेक्षा सन २०१८ मध्ये गंभीर गुन्ह्यावर पोलिसांना नियंत्रण मिळविता आले.

नांदेड : जिल्ह्यात सन २०१७ पेक्षा सन २०१८ मध्ये खून, खूनाचा प्रयत्न, बलात्कार, घरफोडी, वाहनचोरी या गंभीर गुन्ह्यात घट झाली. तर विनयभंग, दरोडा, वाटमारी, दंगल आणि जुगार या गुन्ह्यात वाढ झाल्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी माहिती दिली. 

पोलिस स्थापना दिन आणि पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजीत पत्रकार परिषदेत डॉ. अक्षय शिंदे यांनी ही माहिती दिली. यावेळी प्रभारी पोलिस उपाधिक्षक (मुख्यालय) प्रशांत देशपांडे, जनसंपर्क अधिकारी अशओक लाटकर यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात सन २०१७ पेक्षा सन २०१८ मध्ये गंभीर गुन्ह्यावर पोलिसांना नियंत्रण मिळविता आले. तसेच दाखल झालेल्या गुन्ह्यापैकी बऱ्याचअंशी त्या गुन्ह्याचा तपास लावून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केली. वाढती लोकसंख्या व जिल्ह्याचा विस्तार लक्षात घेता गुन्ह्यावर नियंत्रण मिळविणे हे पोलिसांचे पहिले काम असते.

जिल्ह्यात गंभीर गुन्ह्याची मालिका थांबविण्यास यश मिळाले. तर १७ गुन्हेगारांना यावर्षी जिल्ह्यातून हद्दपार केले. तसेच किनवट तालुक्यात गांजाची शेती उध्वस्त करून कोट्यावधीचा गांडा जप्त केला. त्यातील सर्वच आरोपींना अटक केली. शहरात व्यापाऱ्यावर झालेल्या गोळीबाराच्या आरोपींना पकडण्यास पोलिसांना यश आले. येणाऱ्या काळात पोलिस अधिक्षक संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली नांदेड पोलिस दल गुन्हेगारांवर व समाजकंटकांवर धाक बसवून सर्वसामान्य नांदेडकरांना भयमुक्त वातावरण देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पोलिस जदलाच्या वतीने पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  

या गुन्ह्यात वाढ : 
विनयभंग, दरोडा, वाटमारी, दंगल, इजा पोहचविणे, जुगार, भारतीय हत्यार कायदा (शस्त्र) आणि दिवसाची घरफोडी. 

या गुन्ह्यात घट :
खून, खूनाचा प्रयत्न करणे, बलात्कार, रात्रीची घरफोडी, चोरी, वाहनचोरी, निष्काळजपणे वाहन चालविणे, अमली पदार्थ, प्रतिबंधात्मक कारवाई.

Web Title: crime situation in nanded