भामट्यांच्या टोळीचाही ‘क्‍लोन’!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

औरंगाबाद - चेकची हुबेहूब नक्कल (क्‍लोन) करून बॅंकांना गंडविणाऱ्या टोळीचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला. टोळीच्या चौकशीतून यापूर्वी याच भामट्यांची अशीच एक टोळी सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले. त्या टोळीने गुजरातेतील एका बॅंकेची चार कोटींची फसवणूक केली. यातील चौघांनाही फेब्रुवारीत गुजरात पोलिसांनी अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली. या टोळीकडून शहरातील पाच बॅंकांचीही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे बॅंकेत खाते उघडून गारखेड्यातील पारिजातनगर येथील टीजेएसबी बॅंक, गोजीत फायनान्सियल सर्व्हिसेस, युनियन बॅंक ऑफ इंडियाला गंडविल्याचे समोर आले. यात गुन्हाही नोंदविण्यात आला. हरिश गुंजाळ, मनीषकुमार मौर्य, डब्ल्यू. शेख अरमान शेख, रशीद इम्तियाज खान, इसरार खान गुलाम गौस यांना गुन्हे शाखेने अटक केली होती. अशाच प्रकारे हुबेहूब गुन्हे करणारी टोळी गुजरातेत कार्यरत होती. येथील टीपीनगर भागातील इंडूसन बॅंकेत आदेश ट्रेडिंग कंपनीचा नक्कल केलेला चेक वटवून चार कोटींना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. यात सहारणपूर पोलिसांनी फेब्रुवारीत मुंबईतील पालघर येथून चौघांना तसेच त्याच बॅंकेच्या एका अधिकाऱ्यालाही अटक केली होती. या टोळीने शहरातील कर्नाटका, आंध्रा बॅंक तसेच अन्य एका बॅंकेला गंडवले. इंडियन ओव्हरसीज बॅंकेत नऊ लाखांचा व सिंडिकेट बॅंकेत साडेचार लाखांचा क्‍लोन केलेला चेक जमा केला; पण दोन्ही बॅंकांना संशय आल्याने ते चेक वटविण्यात आले नाहीत. यामुळे बॅंकांची फसगत टळली.

बॅंका पुढे येईनात
भामट्यांनी शहरातील तीन बॅंकांनंतर आणखी पाच बॅंकांना गंडविल्याचे तपासातून पुढे आले. परंतु, स्टेटस व भीतीपोटी फसवणूक झालेल्या बॅंका तक्रार देण्यास पुढे येत नसल्याची बाबही समोर आली आहे.

चौघे पालघरचे
गुजरात पोलिसांनी भामट्यांच्या या टोळीतील पाचजणांना बेड्या ठोकल्या. यात चौघे पालघर येथील असून, फेब्रुवारी महिन्यात त्यांना अटक झाली होती. या प्रकरणात संशयावरून तेथील एका बॅंक कर्मचाऱ्यालाही अटक झाली, असे पोलिस निरीक्षक सावंत यांनी सांगितले. 

चेक असा केला क्‍लोन
त्याच बॅंकेच्या चेकवरील धारकाचे नाव व क्रमांक केमिकलद्वारे खोडले जात होते. त्यावर बनावट क्रमांक व नाव प्रिंट करून हा क्‍लोन (हुबेहूब नक्कल) केलेला चेक बॅंकेत जमा करून रक्कम हडपली जात होती, असे प्राथमिक तपासातून समोर आले.

Web Title: criminal gang clone crime