आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

लातूर - आठ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून तिला डांबून ठेवून मारहाण करणाऱ्या बावची (ता. रेणापूर) येथील पंडित दत्तू इचके (वय 36) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. रेणापूर येथे दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी नुकताच हा निकाल दिला.

रेणापूरच्या शिवाजी कॉलेज परिसरातील पीडित बालिका आत्यासोबत राहत होती. ही आत्या व पंडित दत्तू इचके हे पती-पत्नी या नात्याने एकत्र राहत होते. सात एप्रिल 2016रोजी रात्री पंडित मारहाण करत असल्याने पत्नी घरातून निघून गेली. त्यानंतर पंडितने घरात एकट्याच असलेल्या पीडित बालिकेवर बलात्कार केला.

Web Title: criminal punishment crime rape case