हद्दपार असलेल्या गुन्हेगाराला अटक; इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल 

प्रल्हाद कांबळे
रविवार, 15 जुलै 2018

केळी मार्केट परिसरात राहणारा गुन्हेगार परवेज उर्फ नरबा गणेश जोंधळे (वय २७) याला उपविभागीय अधिकाऱ्यांनी जा. क्र. २०१७/ हद्दपार/ एमएजी/ सीआर०१/ नांदेड, ता. १६ आॅगष्ट २०१७/ मुंबई पोलिस कायदा १९५१ चे कलम ५६ (डी) ( ब) अन्वये जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले होते.

नांदेड - उपविभागीय अधिकाऱ्यांनी हद्दपार केल्यानंतर दबा धरून याच शहरात बसलेल्या गुन्हेगाराला इतवारा पोलिसांनी १३ जूलैच्या रात्री केळी मार्केट परिसरातून अटक केली. त्याच्याकडून एक तलवार जप्त केली आहे. 

केळी मार्केट परिसरात राहणारा गुन्हेगार परवेज उर्फ नरबा गणेश जोंधळे (वय २७) याला उपविभागीय अधिकाऱ्यांनी जा. क्र. २०१७/ हद्दपार/ एमएजी/ सीआर०१/ नांदेड, ता. १६ आॅगष्ट २०१७/ मुंबई पोलिस कायदा १९५१ चे कलम ५६ (डी) ( ब) अन्वये जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले होते. परंतु तो कोणतीही परवानगी न घेता पोलिसांना गुंगारा देत तो येथेच दबा धरुन बसला होता. १३ जूलैच्या रात्री दारुच्या नशेत हातात तलवार घेऊन केळी मार्केट परिसरात असलेल्या महापालिकेच्या रुग्णालयासमोर हातात तलवार घेऊन दहशत पसरत होता. ही बाब इतवारा पोलिसांना समजताच त्याला शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडील तलवार जप्त केली. पोलिस नाईक प्रमोद काळे यांच्या फिर्यादीवरुन इतवार ठाण्यात परवेज उर्फ नरबा जोंधळेविरूद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलिस शिपाई श्री. वाके हे करीत आहेत. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: criminals arrested case filed in etwara police station at nanded