गणेशोत्सवात औरंगाबादवर साथीच्या रोगाचे संकट

Crisis of epidemic Disease at Aurangabad in Ganesh Festival
Crisis of epidemic Disease at Aurangabad in Ganesh Festival

औरंगाबाद : शहरातील घाटी रुग्णालयात गेल्या महिनाभरापासून ताप सदृष्य साथीचे रुग्ण वाढले आहे. घाटीत 6 डेंग्यू, 2 स्वाईन फ्ल्यू सदृश्य, तर 230 तापाचे रुग्ण दाखल झाल्याने घाटीच्या डॉक्टरांनी चिंता व्यक्त करत महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे आपत्कालीन वॉर्ड सुरु करण्यासाठी मदत करण्याची मागणी केली.

एक ऑगस्टपासून घाटीत 230 तापाचे रुग्ण दाखल झाले. दररोज सहा ते आठ तापाचे रुग्ण दाखल होत आहे. त्यात डेंग्यू न्यूमोनियाचे 6 रुग्ण आढळले तर स्वाईन फ्ल्यूच्या चार रुग्णांपैकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. त्यांच्यावर घाटीच्या वार्ड 6 मध्ये उपचार सुरू आहे. रुग्ण संख्या वाढल्याने आयसोलेशन वार्ड ला महिलाचा वार्ड करण्यात आला तर वार्ड 5 सुरू करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे. 

महापालिका करणार मदत
महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज दुपारी तीन वाजता शहरातील आरोग्य अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलावली असून घाटीला सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन वैद्यकीय अधिक्षक डॉ भारत सोनवणे व मेडिसिन विभागप्रमुख डॉ मीनाक्षी भट्टाचार्य यांना दिले. तर महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू टेस्टिंगच्या 50 किट तात्काळ पोहचवत असल्याचे सांगितले.



काळजी घ्या, प्रतिकारक्षमता वाढवा
तापाची साथ आहे, मच्छर चावणार नाहीत यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी. धुणे भांडे झाल्यावर महिलांनी ती जागा स्वच्छ धुवावी. कुंड्या व शोभेच्या वस्तूंमध्ये पाणी साचू देऊ नका. तसेच ताप सर्दी खोकल्याकडे या वेळी दुर्लक्ष नको.
- डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसिन विभागप्रमुख, घाटी रुग्णालय औरंगाबाद.

ताप सदृष्य साथ, घाबरू नका 
ताप सदृष्य साथ आहे. मात्र, घाबरण्याचे कारण नाही. घाटीत रुग्ण वाढत आहे त्यामुळे स्वतंत्र आपत्कालीन वार्ड मेडिसिन विभागात सुरू करत आहोत. औषधी व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने महापालिका व आरोग्य उपसंचालकांकडे मदत मागितली आहे. लवकरच व्यवस्था होईल.
- डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी रुग्णालय, औरंगाबाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com