मराठवाड्यातील कपाशी, सोयाबीनवर पुन्हा संकट

crisis on kapashi and soyabeen in Marathwada
crisis on kapashi and soyabeen in Marathwada

परभणी - मराठवाड्यात काही भागात पुन्हा बोंडअळी डोके वर काढत असल्याने शेतकऱ्यांनी सावधगिरी म्हणून वेळीच बंदोबस्त करण्याचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने दिला आहे. दरम्यान कापसापाठोपाठ शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

मराठवाड्यातील प्रमुख पिक असलेल्या कपाशी आणि सोयाबीन या पिकावर सातत्याने संकटाची मालिका सुरु आहे. सुरवातीला पेरणीमध्ये आलेली अनियमता, पावसाचा खंड, पुन्हा अतिवृष्टी, कपाशीवर बोंडअळी, मर रोग, सोयाबीनवर पाने खाणारी अळी यामुळे या दोन्ही पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. मध्यंतरी बोंडअळीवर सामुहिक प्रयत्नातून नियंत्रण आले होते.

मात्र आता पुन्हा बोंडे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या कपाशीवर बोंडअळीचे पतंग दिसू लागली आहेत. प्रादुर्भाव झालेली फुले अर्धवट उमलेलेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. यालाच डोमकळी म्हणतात. या बोंडअळीचा वेळीच बंदोबस्त न केल्यास उद्रेक होऊन मोठे नुकसान होण्याची भिती परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील 

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. यु. एन. आळसे यांनी व्यक्त केली आहे. मराठवाड्याच्या काही भागात डोमकळ्यामध्ये बोंडअळी दिसून येत आहे. त्यामुळे अशा डोमकळ्या नष्ट करण्याचा सल्ला डॉ. आळसे यांनी दिला आहे. फवारणीसाठी क्लोरॅन्ट्रीनीलीपोल 9.3 टक्के अधिक लॅमडा सायहॅलोथ्रीन 4.6 टक्के झेड सी किंवा इंडाक्झाकार्ब 14.5 टक्के अधिक असीटामाप्रिड 7.7 टक्के एस. सी. यापैकी एक किटकनाशक फवारणीची शिफारस कृषि विद्यापीठाने केली आहे.

सोयाबीनवर करपा रोग -
सोयाबीन पिक येत्या महिनाभरात काढणीला येणार आहे.उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीनला अतिवृष्ठीमुळे करपा रोगाने ग्रासले आहे. शेंगा करपुन गळून जात असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. अशावेळी टेब्युकोनॉझोल 10 टक्के डब्ल्युपी अधिक सल्फर 65 टक्के, डब्ल्युजी 25 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी असा सल्ला कृषि विद्यापीठाने दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com