जायकवाडीत फोडली जाताहेत मगरींची अंडी

eggs
eggs

औरंगाबाद : जायकवाडी धरणात मुबलक खाद्य असल्यामुळे मगरींनी आजवर कधी माणसावर हल्ला केला नाही. मच्छिमारांनाही त्यांच्या अस्तित्त्वाची सवय आहे. परंतु, कोरड्या पात्रात गाळपेरा करण्यासाठी मोटार टाकून पाणी चोरणाऱ्यांनी नाहक भीतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप पर्यावरणतज्ज्ञांनी केला आहे. तसेच, मगरींची अंडी फोडण्याचे गंभीर प्रकारही समोर येत आहेत.

मगर हा जायकवाडी धरणाच्या परिसंस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. नाथसागरात आठ ते दहा मगरींचे आस्तिस्व आहे. अनेकदा मच्छिमारांना त्या गाळात किंवा पाण्याच्या कडेला आलेल्या दिसून येतात. गुरुवारीही (ता. दोन) खुल्या कारागृहाजवळील धरणपात्रात दोन मगरींचे दर्शन झाले. या घटनेमुळे धरणात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांसह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे बोलले जात असले, तरी वन आणि पर्यावरणतज्ज्ञांनी वेगळे मत व्यक्त केले आहे. धरणाच्या काठाने कोरड्या पात्रात गाळपेरा करणाऱ्या आणि धरणात अवैध मोटारी टाकून पाणी उपसणाऱ्यांनीच मगरींमुळे जिवाला धोका असल्याची ओरड चालवल्याचे बोलले जात आहे.

मगर कुणाला नकोय?
गेल्यावर्षी जुन्या कावसानमध्ये आढळलेल्या मगरीला वन विभागाने पेंच अभयारण्यात सोडले होते. मात्र, जायकवाडीतील मगरींना पाण्यात मुबलक खाद्य आहे. मोठमोठ्या माशांवर ताव मारुन सुस्तावलेल्या मगरी काठावर किंवा खडकावर विश्रांती घेताना अनेकदा दिसतात. आजवर कधीही त्यांनी माणसावर हल्ला चढवल्याची घटना घडलेली नाही. धरणातील मगरींमुळे जीवाला धोका असल्याचा बागुलबुवा नाहक उभा केला जात आहे. विनाकारण जवळ जाऊन त्रास दिल्याखेरीज त्या आक्रमकही होत नाहीत, असे वन्यजीव अभ्यासक डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले. काही अज्ञात लोकांनी मगरीची अंडी फोडून टाकल्याचे निदर्शनास आले असून, वन विभागाने गस्त कडक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

जायकवाडीतील मगरींमुळे धोका असल्याची शेतकऱ्यांची काही तक्रार अजून आलेली नाही. तरीही वनरक्षकांना या प्रकाराची चौकशी करून सविस्तर अहवाल देण्यास सांगितले आहे.
- आर. आर. काळे, विभागीय अधिकारी, वन्यजीव विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com