‘या’ जिल्ह्यात सहा पिकांसाठी पीकविमा लागू

file photo
file photo

परभणी : पंतप्रधान पीकविमा योजना रब्बीच्या सहा पिकांसाठी लागू करण्यात आली आहे. त्यासाठी ता.३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. परभणी जिल्ह्याचे कंत्राट भारती एक्सा जनरल विमा कंपनीला मिळाले आहे. ज्वारी पिकासाठी सर्वच मंडळांचा समावेश झाला असून गव्हासाठी १८ आणि हरभऱ्यासाठी २९ मंडळांचा समावेश झाला आहे.

गतवर्षी दुष्काळामुळे खरिपासह रब्बी हंगाम वाया गेला. यंदाही अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे अतोनात नुकसान झालेले आहे. नुकसान होऊनही अद्यापही विमा कंपनीने नुकसान भरपाई जाहीर केलेली नाही. नुकसान झाल्यावर तीस दिवसांत भरपाई मिळणे आपेक्षित असताना अजूनही कोणतीही हालचाल झाली नसल्याने शेतकरी विमा भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा रब्बी हंगामाच्या पेरण्या उशिरा सुरू झाल्या आहेत. सध्या चांगली ओल असून उगवणदेखील चांगल्या प्रकारे होत आहे. भविष्यातील संकटाचे काही सांगता येत नसल्याने यंदाही पीकविमा योजना लागू करण्यात आली आहे.

तीन अठवड्यांत नुकसान भरपाई 
 राज्याच्या कृषी विभागाने बागायती गहू, बागायती ज्वारी व जिरायती ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग आणि रब्बी कांदा या सहा पिकांसाठी विमा योजना लागू केली आहे. रब्बी पिकांचे कापणी प्रयोग झाल्यानंतर उंबरठा उत्पादन काढले जाते. सरासरी उत्पन्नाची आकडेवारी कृषी विभागाकडून विमा कंपन्यांना ता. ३१ जुलैपर्यंत दिली जाणार आहे. सरासरी उत्पन्नाची आकडेवारी आणि सरकारकडून विमा योजनेचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर तीन अठवड्यांत नुकसान भरपाई दिली जाईल. परभणीतील १८ मंडळांना गव्हासाठी आणि २९ मंडळांना हरभरा पिकासाठी विमा योजना लागू झाली आहे. तसेच सर्वच ३८ मंडळांना ज्वारी पिकासाठी अधिसूचित करण्यात आले आहे.


तीन तालुक्यांचा संभ्रम
हरभरा पिकासाठी पाथरी, मानवत आणि पालम तालुके अधिसूचित म्हणून घोषित झाले आहेत. मात्र, पीक आणि मंडळ यादीत या तिन्ही तालुक्यांतील एकाही मंडळाचा समावेश नाही. त्यामुळे तीन तालुक्यांविषयी संभ्रम आहे.

हरभरा पिकासाठी समावेश असलेली मंडळे
परभणी, जांब, झरी, पेडगाव, सिंगणापूर, दैठणा, पिंगळी, गंगाखेड, महातपुरी, माखणी, राणीसावरगाव, सोनपेठ, आवलगाव, चारठाणा, सावंगी म्हा., बामणी बु., आडगाव बु., बोरी, जिंतूर, पूर्णा, ताडकळस, लिमला, कात्नेश्वर, चुडावा, सेलू, देऊळगावगात, कुपटा, वालूर, चिकलठाणा, गंगाखेड, सोनपेठ, जिंतूर, पूर्णा आणि सेलू तालुक्यातील सर्वच मंडळांचा समावेश झाला आहे.
गव्हासाठी परभणी, झरी, पेडगाव, जांब, सिंगणापूर, दैठणा, पिंगळी, जिंतूर, बोरी, आडगाव बाजार, सावंगी म्हाळसा, बामणी बु., चारठाणा, पूर्णा, ताडकळस, लिमला, कातनेश्वर, चुडावा या १८ मंडळांचा समावेश आहे.


 

कर्जदार शेतकऱ्यांना विमा बंधनकारक

विविध बॅंका, सेवा सहकारी सोसायट्यांमार्फत पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजना बंधनकारक आहे. तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com