मराठवाड्यात पीक कर्जवाटप 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिलेले उद्दिष्टे दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सरकारतर्फे बॅंकांना देण्यात आल्या आहेत. असे असतानाही सोमवारपर्यंत (ता.15) मराठवाड्यात केवळ 246 कोटींचे कर्जवाटप करण्यात आले.

औरंगाबाद - पीक कर्जवाटपाची प्रक्रिया मराठवाड्यात संथ गतीने सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिलेले उद्दिष्टे दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सरकारतर्फे बॅंकांना देण्यात आल्या आहेत. असे असतानाही सोमवारपर्यंत (ता.15) मराठवाड्यात केवळ 246 कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. उर्वरित वाटप सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी दिली. 

मराठवाड्यात जुलैचा तिसरा आठवडा सुरू आहे. तरीही पुरेसा पाऊस नसल्यामुळे अनेक ठिकाणी पेरणी झाली नाही. तर कुठे झालेली पेरणी उलटण्याची वेळ आली. नैसर्गिक आपत्ती काही मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत. अशा स्थितीत पीककर्जाचा आधार असतो; परंतु मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तोही मिळालेला नाही. 

मराठवाड्यातील यंदाच्या खरिपाकरिता व्यापारी, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना त्यांच्या परिस्थितीनुसार कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मराठवाड्यात एक हजार 131 कोटींचे उद्दिष्ट बॅंकांना देण्यात आले आहे. 15 जुलैपर्यंत चारही जिल्ह्यात उद्दिष्टाच्या केवळ 21.80 टक्‍के कर्जवाटप करताना बॅंकांनी चार लाख 70 हजार 989 सभासदांना केवळ 246 कोटी 75 लाखांचे हजारांचे कर्जवाटप केल्याचे समोर आले. 

बॅंक-------------------- कर्ज वाटप कोटींत ---टक्‍केवारी 
जिल्हा मध्यवर्ती बॅक------- 119681.53 --------57.84 
व्यापारी बॅंक---------------95396.08---------12.43 
ग्रामीण बॅंक----------------31673.90---------20.09 
एकूण---------------------246750.90---------21.80 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crop loan allocation in Marathwada