पिक विमा शेतकऱ्यांचे सुरक्षा कवच 

नवनाथ इधाटे
शुक्रवार, 4 मे 2018

फुलंब्री - दुष्काळात पिक विमा शेतकऱ्यांचे सुरक्षा कवच असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा दरवर्षी न चुकता काढायला पाहिजे. पिक विम्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान भरून निघत असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली. फुलंब्री येथील नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये कृषी विभागा अंतर्गत किसान कल्याण दिवस बुधवारी (ता.दोन) साजरा करण्यात आला. त्यावेळी बागडे बोलत होते. 

या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण, पंचायत समितीचे सभापती सर्जेराव मेटे, जिल्हा परिषद सदस्या अनुराधा चव्हाण, शिवाजीराव पाथ्रीकर, फुलंब्री नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, नायब तहसीलदार उद्धव नाईक, गटविकास अधिकारी विठ्ठल हरकळ, तालुका कृषी अधिकारी शिरीष घनबहादूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना श्री.बागडे म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये जलसंधारणाच्या कामामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतीला सिंचनाची सुविधा असल्यास दर्जेदार उत्पादन मिळू शकते. शेतमालाची नैसर्गिकरित्या होणारे नुकसान पिक विम्याच्या माध्यमातून भरून निघते. मागील वर्षी 20 पिक विमा कंपन्यांना पिक विम्याची तारीख वाढवायला लावली होती. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी रांगेत उभे राहून पिक विमा काढला. त्याचा फायदा आता त्यांना मिळणार आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून रेशीम शेती, कुकुट पालन, दुग्ध यासारखे आदी व्यवसाय शेतकऱ्यांनी करावेत. तसेच शासनाने बाजार समितीच्या माध्यमातून शेतमाल तारण योजना आमलात आणलेली आहे. त्याचाही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन श्री,बागडे यांनी केले. 

याप्रसंगी उपसभापती एकनाथ धटिंग, पंचायत समिती सदस्य सविता फुके, संजय त्रिभुवन, नगरपंचायतीचे सभापती अजय शेरकर, गजानन नागरे, बाजार समितीचे संचालक रोषण अवसरमल, मंगलाताई वाहेगावकर, बाजार समितीचे सचिव मनोज गोरे, अप्पासाहेब काकडे, सहायक गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे, राजू तुपे, जनार्दन तुपे, कृषी सहायक रामभाऊ साळुंके, प्रकाश तुपे आदींची मोठ्या संखेने उपस्थिती होती.

Web Title: crops Insurance: Farmers' safety cover