जालना जिल्ह्यात बघा कसे आहे लॉकडाऊन

उमेश वाघमारे
सोमवार, 1 जून 2020

जालना जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या तीन दिवसांच्या संचारबंदीनंतर सोमवारी (ता.एक) जालना शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे सकाळपासून शहरातील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी होती. त्यामुळे आता कोरोनापासून वाचण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.

जालना: जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या तीन दिवसांच्या संचारबंदीनंतर सोमवारी (ता.एक) जालना शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे सकाळपासून शहरातील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी होती. त्यामुळे आता कोरोनापासून वाचण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.  

हेही वाचा- वडिलाचा दफनविधी झाल्याच्या दिवशीच मुलगा पॉझिटिव्ह

दरम्यान केंद्र आणि राज्य शासनाने लॉकडाऊन शिथिल करत पून्हा सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सोमवारी (ता.एक) ता. ३० जूनपर्यंत लॉकडाऊनचे आदेश जाहीर केले आहेत. कोरोनाचा विळखा रोखण्यासाठी २२ मार्चपासून देशासह राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले. मात्र, कोरोनाचा विळखा रोखण्यात काही प्रमाणात अपयश आल्याचे चित्र असून राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

मुंबई येथून गावी परतलेल्या अनेक व्यक्तीमुळे ग्रामीण भागात ही कोरोनाने प्रवेश केला आहे. परिणामी जालना जिल्ह्यात आतापर्यंत १२६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर आतापर्यंत ४६ जण उपचारानंतर कोरोना मुक्त झाले आहेत. दरम्यान जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी ता. २९ मेपासून तीन दिवसांचे संचारबंदीचे आदेश दिले होते.

हे वाचलंत का? ६५ वर्षीय पत्नीला आधी काठीने मारले, पण जीव जाईना म्हणून...अखेर...

त्यामुळे तीन दिवस शहरासह जिल्ह्यात काटेकोरपणे संचारबंदी आदेशाचे पालन करण्यात आले. दरम्यान सोमवारी (ता.एक) शहरासह जिल्ह्यात बाजार व दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधित सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सोमवारी (ता.एक) शहरातील बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. भाजीपाला विक्रेत्यापासून ते इतर दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी पाहण्यास मिळाली.

दरम्यान आता केंद्र शासनासह राज्य शासनाकडून लाॅकडाउन रिओपन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मात्र, या काळात कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये, म्हणून आता प्रत्येक नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येकाने फिजिकल डिस्टन्सींगचे पालन करणे, मास्क वापरणे, सॅनिटाझर किंवा साबनाने सतत हात धुणे याबाबी करणे अपेक्षित आहे. तरच कोरोनापासून प्रत्येक जण सुरक्षित राहणार आहे, यात शंका नाही.

हेही वाचा:शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत

लॉकडाऊन म्हणजे लॉकडाऊनच

जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत ता.३० जुनपर्यंत वाढविल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सोमवारी (ता.एक) आदेश जारी केले आहे. ता. ३० जुनपर्यंत रात्री नऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. ज्येष्ठ नागरिक, अनेक व्यासधी असणाऱ्या व्यक्ती, गरोदर माता व दहा वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारण वगळता घरातच थांबणे.

कंटेनमेंट झोन क्षेत्रातील नागरिकांना वैद्यकीय व अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्यासाठी बाहेर जाण्या-येण्यास प्रतिबंध असेल. क्रीडा संकुले व स्टेडियमचे बाह्य भाग व इतर खुल्या सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र व्यायामासाठी परवानगी देण्यात आली आहे. स्टेडियमचेच्या अंतरभागात व्यायामासाठी परवानगी राहणार नाही. दुचाकी एक, तीन व चार चाकी वाहनत चालकासह दोन प्रवासी जिल्ह्याअंतर्गत बस सेवा ही ५० टक्के असन क्षमतेनुसार सुरू केली जाणार आहे.

सर्व दुकाने ज्यात मार्केट, शॉप्स, केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर हे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत चालू ठेवता येतील. शाऴा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण, प्रशिक्षण संस्था, सर्व सिनेमा हॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर, बार, सभागृह, असेंब्ली हॉल हे बंद असणार आहेत. सर्व धार्मिक स्थळे, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट व इतर बाबींसाठी शिथिलता देण्यासंदर्भात शासना मार्फत प्राप्त होणाऱ्या सूचनांनुसार टप्प्या-टप्प्याने निर्देश देण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

हे वाचंलत का? - आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowd In Market Jalna Marathi news