esakal | हिंगोलीत सात दिवसानंतर उघडलेल्या बाजारपेठेत नागरिकांची गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

यामुळे बाजारात भाजीपाला, किराणा खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. तर  विविध बँकेत ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या.

हिंगोलीत सात दिवसानंतर उघडलेल्या बाजारपेठेत नागरिकांची गर्दी

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सात दिवसाची संचारबंदी लागु केली होती. त्याचा कालावधी संपल्याने सोमवारी (ता. आठ) ती शिथिल करण्यात आली. यामुळे बाजारात भाजीपाला, किराणा खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. तर  विविध बँकेत ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. 

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आठवड्यापुर्वी संचारबंदी लागु केली होती. यात मेडिकल, अत्यावश्यक सेवा वगळता इतर अस्थापना, दुकाने बंद होती. त्यानंतर सोमवारी या संचारबंदीचा कालावधी संपल्याने संचारबंदी शिथिल करण्यात आली. यात किराणा, भाजीपाला, दुध, मटन विक्री या दुकानासह बँका सुरू होत्या. यामुळे बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. विविध बँकेत ग्राहकांच्या लाबंच लांब रांगा लागल्या होत्या. काही नागरिक तोंडाला मास्क बांधून तर काही बिनामास्क शिवाय बाजारात फिरताना दिसत होते. 

दरम्यान, कपडा दुकान, सराफा, जनरल स्टोअर्स, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीक्स, फर्निचर, भांड्याची दुकाने, हार्डवेअर, आँटोमोबाईल्स ही दुकाने उघडण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी परवानगी दिली नसल्याने ती बंदच होती. याबाबत जिल्हा व्यापारी महासंघातर्फे दुकाने उघडण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर जिल्ह्यात शाळा महाविद्यालय देखील बंद होते. शहरातील वरिष्ठ महाविद्यालयात स्वारातीम विद्यापीठाच्या बीए, बीकाँम, बीएस्सी द्वीतीय वर्षाच्या पदवी परिक्षा सुरु होत्या.

दरम्यान, जिल्ह्यात रविवारी (ता. सात)  नवीन ५५  रुग्ण आढळून आले आहेत. ४०  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याचे  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी  सांगितले आढळलेल्या रुग्णांत नऊ रँपीड टेस्ट तर ४६ रुग्ण आरटीपीसीआर टेस्ट मध्ये आढळून आले आहेत. ४० रुग्ण बरे झाल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यात एकुण चार हजार ४०३ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी  तीन हजार ९८२ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला एकूण ३५८ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि ६३ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यु झाला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image