मुख्याध्यापकांनीच उभारले सांस्‍कृतिक सभागृह

satkar foto
satkar foto

शेवाळा (जि. हिंगोली) : कळमनुरी तालुक्‍यातील शेवाळा येथील जिल्‍हा परिषदे केंद्रीय कन्या शाळेतील मुख्याध्यापकाने स्‍व-खर्चातून शाळेत सांस्‍कृतिक सभागृह उभारले. इतर शिक्षकांनीही सभागृहाच्या रंगरंगोटीचा खर्च उचलून हातभार लावला. शिक्षकांच्या या उपक्रमाचे कौतूक होत आहे.


कळमनुरी तालुक्‍यातील शेवाळा येथे केंद्रीय कन्या शाळा आहे. शाळेत परिसरातील अनेक विद्यार्थींनी शिक्षण घेतात. अभ्यासक्रमासह विविध उपक्रमही राबविले जातात. मात्र, सांस्कृतिक सभागृह उपलब्ध नसल्याने उपक्रम राबवितांना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे शाळेत सांस्कृतिक सभागृह उभारण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला. उच्चश्रेणी मुख्याध्यापक बी. एच. आडे यांनी स्वत: बांधकामाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला. दिवाळीच्या सुट्यांत त्यांनी सांस्‍कृतिक सभागृहाचे बांधकाम पूर्ण केले. यासाठी ३२ हजार पाचशे रुपयांचा खर्च आला.

आपलाही या उपक्रमात हातभार असावा, यासाठी इतर शिक्षक व गावकऱ्यांनही रंगरंगोटीचा खर्च उचलला. तसेच सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांनी षटकोनी खोलीची डागडूजी केली. सांस्‍कृतिक सभागृहाला मॉ राजमाता जिजाऊ सांस्‍कृतिक सभागृह असे नाव देण्यात आले. शाळेत बांधण्यात आलेल्या या सांस्‍कृतिक सभागृहामुळे विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रम घेण्यासाठी उपयोग होणार आहे. शिक्षकांच्या या उपक्रमाचे गावकऱ्यांतून कौतूक केले जात आहे.

पंचायत समितीचे उपसभापती अजय सावंत व सरपंच अभय सावंत यांच्या हस्ते मुख्याध्यापक श्री. आडे यांचा सत्‍कार करण्यात अाला. या वेळी विलास गांजरे, संदीप पाटील, चंद्रकांत सुर्यवंशी, शिवाजी सावंत, नदीम नाईक, शेख साबेर, एस. बी. गायकवाड, टी. व्ही. मुंघाटे, एस. व्ही. सेवनकर, एस. एस. भिसे, ए. आर. फरकंडकर, राजकुमार व्यवहारे आदींची उपस्‍थिती होती.

शाळेतील षटकोनी वर्गखोलीची पडझड झाली होती. तसेच सांस्‍कृतिक सभागृहाअभावी विविध उपक्रम राबविताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. दिवाळीच्या सुट्यांत हे काम पूर्ण केले. इतर शिक्षकांनी या उपक्रमात सहभाग घेत सभागृहाच्या रंगरंगोटीचे काम केले.
-एच. डी. आडे, मुख्याध्यापक
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com