सांस्कृतिक राष्ट्रवाद नावाचा आरएसएस कडून छळ : प्रकाश आंबेडकर

योगेश पायघन
रविवार, 8 जुलै 2018

औरंगाबाद - सांस्कृतिक राष्ट्रवाद नावाचा शब्द छळ आरएसएस कडून चालू आहे.संस्कृतीला सीमा असल्याचे मी मनात नाही.ज्या गोष्टीला सीमा नाही. त्यातून राष्ट्र निर्माण होईल असे वाटत नाही.आपुलकी व विषमता संस्कृती जोपासत असले. तेव्हा वेगवेगळ्या संस्कृती वर्चस्व लादण्याची परिस्थिती निर्माण करते.अनेक कंगोरे संस्कृतीला आहेत. त्यातील आपुलकीची भावना जपण्याचा गाभा असावी. तसेच भाषा, इतिहासही राष्ट्र निर्माण करू शकते. असे मत भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडले.

अनुसूचित जाती, जमाती व बौद्ध आयुर्विमा कर्मचारी कल्याण संघटनेच्या वतीने रविवारी (ता. 8) स्व. भानुदासराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अमित भुईगळ, मंगल खिवंसरा, कृष्णा बनकर, भीमराव सरवदे, शांताराम पंदेरे, श्रीरंग ससाणे, अशोक कुशेर, टी डी काकडे, श्रीमंत वाघमारे, धर्मा सोनवणे, व्ही के पांढरे, आर एस म्हस्के, साहेबराव वानखेडे, मोहम्मद खालेद, एस बी वानखेडे, सोनल पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती. विनोद नरवाडे, संतोष भराड यांच्या सुरमिलन च्या चमूने भीमगीतांचे सादरीकरण केले. 117 वी घटना दुरुस्तीला हॅट घातला नाही यावर आंदोलने होऊन कागरांना न्याय मिळाला पाहिजे असे मत सरवदे यांनी व्यक्त केले. तर संघटित होऊन प्रकाश आंबेडकरांच्या मागे उभे राहण्याचे आवाहन करत जिंकण्यासाठी उभा राहिलेले उमेदवार येत्या निवडणुकीत देण्याची मागणी अशोक कुशेर यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
संघटनेच्या वतीने तीन लाख रुपयांची मदत प्रबुद्ध भारत ला देण्यात आली.ओबीसी संघटनेच्या सुशील कचरे, कानू वाघ यांनीही 25 हजार रुपयांची मदत केली.

Web Title: Cultural nationalism RSS Prakash Ambedkar