'नोटाबंदीच्या निर्णयात चांगल्यांचेही मरण'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

औरंगाबाद - 'देशात केलेली नोटांवरील बंदी ही केमोथेरपी आहे. केमोथेरपीप्रमाणे वाइटांसोबत चांगल्या पेशीही जाळल्या जात आहेत,' अशी खरमरीत टीका लेखक चेतन भगत यांनी आज केली.

येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की नोटाबंदी ही केमोथेरपीसारखीच भयंकर आहे. यातून चांगले होईल असे वाटते; मात्र त्यासाठी चांगल्यांचेही मरण होते आहे. आपल्या पैशांसाठी लोकांनी लावलेल्या रांगांना देशभक्तीशी जोडणे पूर्णपणे चुकीचे आहे. लोक त्रस्त आहेत.

महिना उलटला तरी सारे काही सुरळीत होत नसेल, तर या निर्णयाची अंमलबजावणी अधिक चांगली करता आली असती, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: currency ban decision is bad