नोटाबंदीचा परिणाम काय?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

उस्मानाबाद - पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर त्याचा काय परिणाम झाला याची माहिती शासनाच्या विविध विभागांकडून मागविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या अर्थ खात्याने ही माहिती मागविली असून, त्यानुसार राज्य सरकारच्या प्रधान सचिवांनी सर्व विभागांना लवकरात लवकर माहिती पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. सामान्य जनतेला जुन्या नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी व नव्या नोटा घेण्यासाठी तासन्‌ तास बॅंकेच्या रांगेत थांबावे लागले. या स्थितीत अजूनही फारसा फरक पडलेला नसल्याचे चित्र आहे. त्यात आता केंद्र शासनाच्या अर्थ खात्याकडून नोटाबंदीचा सर्व स्तरांमध्ये काय परिणाम झाला आहे, त्याची माहिती घेण्यात येत आहे.

यासंदर्भात दिलेल्या पत्रामध्ये राज्य शासनाच्या विविध विभागांकडून उलाढालीचे विवरण मागविण्यात आले आहे. नोटाबंदीअगोदर व नंतर किती फरक पडला व त्याची तुलना करून सद्यःस्थितीला उलाढालीची परिस्थिती कशी आहे, याबाबत अहवाल पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरवातीला या निर्णयाचे कौतुक झाले, पण वस्तुस्थिती समोर यावी, नोटाबंदीचा सरकारच्या तिजोरीवर कितपत परिणाम होत आहे, याचाही आढावा घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून राज्य व केंद्राच्या अर्थ खात्याने सुरू केला आहे. 
 
सहकार विभागाकडे विशेष लक्ष 
जिल्हा बॅंका, नागरी बॅंका व पतसंस्थांना नोटाबदलीची परवानगी न दिल्याने तिथे काय परिणाम झाला याची माहितीदेखील यानिमित्ताने समोर येणार आहे. सहकार विभागाच्या अप्पर निबंधकांनी राज्यातील सर्व विभागीय सहनिबंधकांना पतसंस्थांवर नोटाबंदीचा परिणाम कशाप्रकारे झाला, पूर्वीची सर्वसाधारण उलाढाल व आजच्या उलाढालीची परिस्थिती काय आहे, आठ नोव्हेंबरला संस्थेकडे असलेल्या ठेवी, ३० नोव्हेंबरपर्यंत असलेल्या ठेवी याची एकूण रक्कम किती आहे, याचा अहवाल मागविण्यात आला आहे. 

Web Title: currency ban effect