रात्रभर किर्तन, जागरण गोंधळ अन् सरकारच्या नावाने शिमगा

लक्ष्मण वाकडे/प्रविण फुटके
गुरुवार, 19 जुलै 2018

परळी : मराठा समाजाला आरक्षण जाहिर करेपर्यंत मेगा नोकरभरतीला स्थगिती द्यावी यासह बुधवारी (ता. 18) दुपारी मोर्चा निघून सुरु झालेले ठिय्या आंदोलन गुरुवारीही (ता. 19) सुरुच आहे. दरम्यान, आंदोलकांनी रात्रभर किर्तन, जागरण गोंधळ आणि सरकारच्या नावाने घोषणा देऊन शिमगा केला. 

राज्य सरकारने सुरू केलेली मेगा नोकर भरती मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत थांबवावी. मराठा समाजाला आरक्षण लागू करावे. कोपर्डी येथील पिडित मुलीला न्याय द्यावा, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत आदी मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन पुकारले होते. बुधवारी दुपारी परळीतून मोर्चा निघल्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोचला. त्यानंतर ठोस आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेत ठिय्या आंदोलन सुरु केले.

आंदोलक रात्रभर उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या मांडून होते. दरम्यान, आंदोलनस्थळीच खिचडी शिजवून सहभागींना देण्यात आली. तर, परळीतील काहींनी पिठल - भाकर पुरवली. रात्री दहा वाजेच्या दरम्यान किर्तन झाले. तर, त्यानंतर जागरण गोंधळ झाला. रात्रभर आंदोलक सरकार विरोधात घोषणा आणि बोंबा मारुन निषेध करत होते. आता चर्चा नाही तर निर्णय आल्यासच आंदोलन मागे घेणार अन्यथा इथेच ठिय्या असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. दरम्यान, रात्री पांघरण्यासाठी काही नसल्याने अनेकांच्या अंगावर रिमामे पोतडी आढळून आले. सकाळी इथेच चुली पेटवून आंदोलकांना चहा - पान करण्यात आले. 

Web Title: curse to government and Awakening by maratha kranti morcha in parali