संमेलनाच्या प्रचारासाठी सायकल फेरी

उस्मानाबाद ः अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रचार व प्रसारासाठी प्रथमेश तुगावकर यांनी काढलेली सायकल फेरी.
उस्मानाबाद ः अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रचार व प्रसारासाठी प्रथमेश तुगावकर यांनी काढलेली सायकल फेरी.

उस्मानाबाद : आपल्या जन्मभूमीत होत असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रचार आणि प्रसारासाठी संगणक अभियंता असलेल्या प्रथमेश तुगावकर यांनी पुणे येथून सुरू केलेली सायकल फेरी शुक्रवारी (ता. 22) सकाळी उस्मानाबादेत दाखल होणार आहे. या तरुणाच्या स्वागतासाठी उस्मानाबादकर सज्ज असून, शहरातून भव्य सायकल फेरी काढण्यात येणार आहे. 

मुंबईत वास्तव्य 
मूळचे उस्मानाबाद येथील प्रथमेश तुगावकर हे नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास आहेत. संत गोरोबाकाकांच्या पावन भूमीत आणि आपल्या जन्मभूमीत होत असलेले हे संमेलन अधिकाधिक साहित्यप्रेमींपर्यंत पोचविण्यासाठी संमेलनाच्या प्रचार, प्रसारासाठी त्यांनी पुणे येथून बुधवारी (ता.20) पहाटे सहापासून सायकल प्रवास सुरू केला आहे. शुक्रवारी सकाळी सातला ते येडशी (ता. उस्मानाबाद) येथे पोचणार आहेत. तेथे त्यांच्या स्वागतासाठी उस्मानाबाद शहरातील 20 सायकलपटू सज्ज असतील. एकत्रित फेरी येडशी येथून निघणार आहे. 

उस्मानाबादेत आज फेरीचे स्वागत 
शिंगोली येथील चौकामध्ये उस्मानाबादकरांच्या वतीने फेरीचे स्वागत होईल. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रशासनातील अधिकारी, साहित्यिक, नागरिक उपस्थित राहणार आहेत. शिंगोली चौकातून ही फेरी संत ज्ञानेश्वर मंदिर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, रामनगर, समतानगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ताजमहल चित्रमंदिर, काळा मारुती चौक, संत गाडगेबाबा चौक या मार्गाने साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयात येईल. तेथे फेरीचा समारोप होईल.

पर्यावरण संवर्धनाचाही संदेश 
सायकल फेरीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासह स्वच्छ, सुंदर उस्मानाबादचा संदेश देण्याचा उद्देश आहे. या सायकल फेरीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे, चित्रसेन राजेनिंबाळकर, जितेंद्र खंडेरिया यांच्यासह संमेलन संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com