आपला सायकल चोरीचाच धंदा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

औरंगाबाद - भंगारचोरी, पाकीटमारीनंतर तो दुचाकीचोरीकडे वळला, पण एकदा अद्दल घडली म्हणून त्याने पुन्हा आपल्या जुन्या धंद्याकडे वळत सायकलचोरीचाच सपाटा लावला. या अफलातून चोरट्याकडे तब्बल पंचवीस सायकली सापडल्या. विशेषतः त्याने या सायकल गोळा करून ठेवल्याने पोलिसही अचंबित झाले असून यामागील गौडबंगालही अजून उकलले नाही.

औरंगाबाद - भंगारचोरी, पाकीटमारीनंतर तो दुचाकीचोरीकडे वळला, पण एकदा अद्दल घडली म्हणून त्याने पुन्हा आपल्या जुन्या धंद्याकडे वळत सायकलचोरीचाच सपाटा लावला. या अफलातून चोरट्याकडे तब्बल पंचवीस सायकली सापडल्या. विशेषतः त्याने या सायकल गोळा करून ठेवल्याने पोलिसही अचंबित झाले असून यामागील गौडबंगालही अजून उकलले नाही.

धनराज कांतीलाल तरटे (वय 27, रा. नारेगाव) असे त्याचे नाव आहे. तो कंपनीत काम करतो. त्याला एमआयडीसी सिडको पोलिसांनी सात डिसेंबरला नारेगावातून अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता, हा सारा प्रकार समोर आला. त्याने आनंदगाढेनगर येथून चंद्रकांत सांडू हिवराळे यांची सायकल लंपास केली. त्यांच्या तक्रारीनुसार, गुन्हा नोंदवण्यात आला.

सायकल चोरीच्या गुन्ह्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. धनराज तरटेबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला खाक्‍या दाखवल्या. त्याने चमचमनगर, आनंदगाढेनगर, सिडको एन-1 आदी ठिकाणांहून सायकली चोरी केल्या. विशेषत: त्याने महागड्या व गिअरच्या पंचवीस सायकली चोरल्या. यापूर्वी त्याने दोनच सायकलचोरी केली पण गत दोन वर्षांत त्याने पंचवीस सायकली जपून ठेवल्या. कशामुळे सायकली जपून ठेवल्या या बाबीची उकल मात्र अद्याप झाली नाही. त्याच्या घरातून तसेच तो राहत असलेल्या परिसरातून या सायकली पोलिसांनी जप्त केल्या. ही कारवाई उपनिरीक्षक संदीप शिंदे, हवालदार संजय मुंडले, सतीश जाधव, पोलिस शिपाई शाहेद शेख, गणेश राजपूत, विक्रम वाघ यांनी केली.

पोलिसांच्या डोळ्यांत येऊ नये म्हणून...
त्याने एकदा दुचाकी चोरी केली; पण यात तो हर्सूल कारागृहात गेला. जामीन घेण्यासही कुणी लवकर तयार झाले नाही. त्यामुळे त्याचा कारागृहात जरा जास्तच मुक्काम झाला. सुटून आल्यानंतर मात्र त्याने सायकल चोरीचाच सपाटा लावला. तसेच पोलिसांच्या डोळ्यांत येणार नसल्यामुळे ही क्‍लृप्ती त्याने शोधली.

यामुळेच सायकल चोरी
चोरीनंतर पोलिसांचा ससेमिरा लागत नाही, या चोरीला पोलिस गंभीरपणे घेत नाहीत, कुणाला संशयही येत नाही. चोरीनंतर पळवण्यासाठी सुकर आणि दुचाकीसारखी हॅंडललॉक तोडण्याची गरज नाही. अशामुळे तो सायकल चोरीलाच प्राधान्य देत होता.

Web Title: cycle theft business