परभणी: सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकने घेतला पेट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

परभणी ते जिंतूर रोडवरील चारठाणा शिवारात रविवारी (ता.८) पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. औरंगाबाद येथून धर्माबादकडे ३५० टाक्या घेवून हा ट्रक जात होता.

परभणी : स्वयंपाकाच्या सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकने आचानक पेट घेतल्याने ट्रकची केबीन जळून खाक झाली.

परभणी ते जिंतूर रोडवरील चारठाणा शिवारात रविवारी (ता.८) पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. औरंगाबाद येथून धर्माबादकडे ३५० टाक्या घेवून हा ट्रक जात होता. दरम्यान, केबीनमधून काहीतरी जळत असल्याचा वास आल्याने चालकाने खाली उतरून पाहिले असता ट्रकच्या केबीनने पेट घेतल्याचे दिसून आले.

तेव्हा चालकाने माहिती दिल्यानंतर जिंतूर अग्नीशमनदलाचे पथक तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

Web Title: cylinde truck fire in Parbhani